अमजद खान
शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश पाटील यांनी पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय पक्षावरही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी जे आरोप केले आहे त्यामुळे डोंबिवलीत राजकीय भूकंप आला आहे. कुणाल पाटील यांना क्लीन चीट दिली. मला आणि माझ्या मुलाला मारण्याचा कट त्याच्या काकांनी रचला होता. अशा आरोपींना अटक करु नका, असा दबाव माझ्या पक्षातील लोक टाकत होते. त्यामुळे त्या पक्षात राहणे मला जमले नाही, असे म्हणत शिवसेना शिंदे गटातून महेश पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यां विषयी नाराजी बोलून दाखविली आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक महेश पाटील त्यांची बहिण माजी नगरसेविका सुनिता पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील आणि त्यांच्यासह त्यांच्या भावांवर अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल झाला होता. अंबरनाथमध्ये पंढरीनाथ फडके याच्या समर्थकांनी राहुल पाटील नावाच्या व्यक्तीच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणात कुणाल पाटील यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला गेला. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. मात्र मला यात गुंतविले जात आहे, असा धक्कादायक खुलासा कुणाल पाटील यांनी केला होता. पोलिसांचा तपास सुरु होता. याच दरम्यान कुणाल पाटील आणि त्यांच्या भावाना पोलिसांनाकडून क्लिनचीट मिळाल्याची माहिती समोर आली.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय
त्याची चर्चा राजकीय वर्तूळात पसरली. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक महेश पाटील यांनी आरोप केला होता की, त्यांच्यासह त्यांच्या मुलाच्या हत्येचा कट कुणाल पाटील यांचे काका आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वंडार पाटील यांनी रचला होता. याची सुपारी देखील देण्यात आली होती. सध्या कुणाल पाटील हे शिवेसना शिंदे गटात आहे. त्याना कोणतेही पद नाही. महेश पाटील आणि वंडार पाटील कुटुंबियांमध्ये पूर्व वैमनस्य आहे. वंडार पाटील यांच्या मुलाच्या हत्ये प्रकरणात महेश पाटील यांची कल्याण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.कुणाल पाटील हे शिवसेना शिंदे गटात आल्यानंतर महेश पाटील आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले होते. त्याचा परिमाण म्हणजे महेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
महेश पाटील हे कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख होते. महेश पाटीलसह त्यांची बहिण माजी नगरसेविका सुनिता पाटील, त्यांची समर्थक माजी नगरसेविका सायली विचारे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या आधी आज सकाळी शिंदे गटाचे पदाधिकारी अमोल म्हात्रे यानी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये परवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. मात्र ज्या प्रकारे महेश पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष श्रेष्ठींवर आरोप केले आहेत. त्यानंतर शिंदे गटाकडून काय प्रतिकिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नक्की वाचा - Pune News: पुण्यातील गुन्हेगारीचा ‘अल्पवयीन पॅटर्न'!, अंगाचा थरकाप उडवणारी आणखी एक घटना
भाजपचा पक्ष प्रवेश पार पडल्यावर शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आमदार राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, विकास म्हात्रे उपस्थित होते. जे गेले आहेत, त्यांना आणि मित्र पक्षाला खूप-खूप शुभेच्छा. कोणाच्या जाण्याने शिवसेनेला काही फरक पडत नाही. शिवसेनेने केलेला विकास या वरुन जनता त्याचा निर्णय घेईल. जे आरोप झाले आहेत, तो त्यांचा अंतर्गत वाद होता. पक्षाशी त्याचे काही घेणे देणे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत मित्र पक्षाची भूमिका तशीच राहिली आहे. महापौर महायुतीचा बसणार अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आली आहे.