'अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी शिंदेंचे प्रयत्न'

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरही टिकेचे बाण सोडले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. शेवटच्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान होईल. तर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. त्याआधी सत्ता कोणाची येणार? निवडणुकीत काय काय झालं? कोणाची सत्ता येणार कोणाची जाणार? याची चर्चा सुरू झाली असून त्यातूनही राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरही टिकेचे बाण सोडले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'पैशाचा अफाट वापर'

रोखठोक या सदरात राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप करताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणुकीत पैशाचा अफाट वापर केला. प्रत्येक उमेदवाराला त्यांनी 25 ते 30 कोटी रूपयांचे वाटप केले. शिवाय ज्यांना पाडायचे आहे त्यासाठी वेगळ बजेट होते असा गंभीर आरोपही त्यांनी यातून केला आहे. दिल्लीने महाराष्ट्रातले काही बेडूक फुगवले आणि त्यांना नेते केले. ते सर्व नेते 4 जूननंतर राजकीय पटलावरून नष्ठ होतील असेही राऊत या सदरात म्हणाले आहेत. 

हेही वाचा - अखेर निवडणूक आयोगाकडून मतदानाची आकडेवारी जाहीर; सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशानंतर निर्णय

'अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी...' 

पैसे वाटपाच्या आरोपाबरोबरच संजय राऊत यांनी आणखी एक आरोप केला आहे. या आरोपात त्यांनी एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी कट रचला होता असे म्हटले आहे. अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले असे राऊत म्हणाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले आहेत असंही त्यांनी यासदरातून सांगितले. 

हेही वाचा -  साखरझोपेतच काळाचा घाला! झोपडीत बस घुसल्याने 4 मजुरांचा जागीच मृत्यू

'गडकरींना पाडण्याचे प्रयत्न' 

नितीन गडकरी नागपुरातुन निवडून येऊ नयेत म्हणून यासाठी भाजपच्याच बड्यानेत्यांनी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. गडकरींच्या पराभवासाठी सर्व रसद ही फडणवीसांनी पुरवल्याचे राऊत म्हणाले आहेत. मात्र गडकरींचा पराभव होत नाही हे लक्षात आल्यानंतर फडणवीस हे प्रचारात उतरल्याचे राऊत या लेखात म्हणतात. दरम्यान निवडणुकीनंतर योगींना हटवण्याची चर्चा आहे. त्यामुळे योगी समर्थक नारज आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात 30 जागांचा फटका भाजपला बसेल असेही राऊत म्हणाले.   

Advertisement