जाहिरात

Maharashtra Election Result : शिवसेना शिंदेंचीच, महाराष्ट्राचा फैसला! बालेकिल्ल्यात ठाकरेंना धक्का

Maharashtra Election Result 2024 : शिवसेनेतील फुटीनंतर खरा पक्ष कुणाचा ? हा प्रश्न कोर्टात अजून प्रलंबित आहे. पण, जनतेच्या न्यायालयात याचा फैसला झाला आहे.

Maharashtra Election Result : शिवसेना शिंदेंचीच, महाराष्ट्राचा फैसला! बालेकिल्ल्यात ठाकरेंना धक्का
मुंबई:

Maharashtra Election Result 2024 : शिवसेनेतील फुटीनंतर खरा पक्ष कुणाचा ? हा प्रश्न कोर्टात अजून प्रलंबित आहे. पण, जनतेच्या न्यायालयात याचा फैसला झाला आहे. शिवसेनेतील फुटीनंचर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर दणदणीत मात केली आहे. ठाकरे नावाचा करिश्मा नसतानाही शिंदेंनी हे यश मिळवलं आहे. 

लाडक्या बहिणी पाठीशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यशात 'लाडकी बहीण' म्हणजेच महाराष्ट्रातील महिलांचा मोठा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारनं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना सादर केली. या योजनेच्या माध्यमातून 18 ते 60 वयोगटातील लाभार्थी महिलांना दरमहिना 1500 रुपये देण्यात आले. त्याचे तीन हप्ते आत्तापर्यंत महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. या योजनेची दरमहा रक्कम आता 2100 रुपये करणार असल्याचं महायुतीनं जाहीर केलं आहे. त्याचा फायदा शिंदेंना झाला.

Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय?

( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय? )

बाळासाहेबांचे वारसदार

ठाकरे नावाचा वारसा नसतानाही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या परंपरात मतदारांना आपल्याकडं खेचून आणल्याचं या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, हे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात शिंदे यशस्वी झाले. त्याचा शिंदेंना फायदा झाला. 

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षांकडून सातत्यानं शिंदेची गद्दार अशी हेटाळणी केली होती. हे नरेटीव्ह या निवडणुकीत चाललं नाही. पक्षफुटीनंतर ठाकरेंना सहानुभूती मिळाली आहे, असा समज होता. तो समज शिंदेंनी खोटा ठरवला. ठाकरेंची सहानुभूती संपवण्यात या निवडणुकीत शिंदे यशस्वी झाले. उद्धव ठाकरेंच्या बंडात त्यांना साथ देणाऱ्या बहुतेक आमदारांना पुन्हा निवडून आणण्यात शिंदे यांना यश मिळालं आहे. 

Maharashtra Election Result : लोकसभेत कमावलं, पण विधानसभेत गमावलं ! काँग्रेसचं नेमकं काय चुकलं?

( नक्की वाचा : Maharashtra Election Result : लोकसभेत कमावलं, पण विधानसभेत गमावलं ! काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? )

ठाकरेंबरोबरची लढाई आणि प्रत्यक्ष आमदार निवडून आणणं या दोन्ही पातळ्यांवर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. फिल्डवर उतरुन प्रत्यक्ष काम करणारा, नेता ही शिंदेची प्रतिमा गेल्या काही महिन्यांमध्ये निर्माण झाली होती. त्याचा शिंदेंना फायदा झालाय. एकूणच राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणातील एकनाथ शिंदेंची प्रतिमा यामुळे आणखी उजळ झाली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com