BMC Election 2026: देवेंद्र फडणवीसांनी वरळीत गेम फिरवला, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

 ठाकरे बंधूंनी महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केल्यानंतर कुठे आनंद तर कुठे निराशाचं चित्र आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Election 2026 : ठाकरे बंधूने महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केल्यानंतर कुठे आनंद तर कुठे निराशाचं चित्र आहे. तिकीट न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराजी आहे. दरम्यान पालिका निवडणुकीत लढण्यापूर्वीच एका कट्टर मनसैनिकाने राज ठाकरेंची साथ सोडल्याचं वृत्त आहे. 

MNS Ex-Corporator Santosh Dhuri- मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

तिकीट न मिळाल्याने नाराज संतोष धुरी भाजपच्या वाटेवर...

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे अनेक इ्च्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. कट्टर मनसैनिक म्हणून ओळख असलेले संतोष धुरी यंदाच्या निवडणुकीत इच्छुक होते. मात्र ती जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. वॉर्ड क्रमांक १९४ मधून संतोष धुरी इच्छुक होते. मात्र तेथे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यानंतर संतोष धुरी नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. संतोष धुरी यांनी ५ जानेवारी रोजी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री नितेश राणे होते.    

नक्की वाचा - Latur News : हिंदुत्ववादी भाजपाचा लातूरमध्ये 'मुस्लीम पॅटर्न', चक्क 7 उमेदवारांना तिकीट; काय आहे कारण?

मनसे नेते संतोष धुरी यांच्या मुख्यमंत्री भेटीनं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठं खिंडार पडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत माहिती नाही. आज ६ जानेवारी रोजी दुपारी ते भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी माहिती सांगितली जात आहे. 

Advertisement