विदर्भातील पहिल्या टप्यातील 5 लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याअंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मुरकुटडोह येथे 73 टक्के मतदान पार पडलं आहे. मुरकुटडोह या मतदारसंघाअंतर्गत 5 गावं येत असून 658 मतदारांपैकी 482 मतदारांनी मतदान केलं आहे. याशिवाय पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान पार पडलं आहे. हा भाग मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग असून मोठ्या प्रमाणत पोलीस जवान व सी 60 कमांडो, एसआरपीफ जनाच्या तैनात आहेत.
आज पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, रामटेक या तीन लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. चढत्या उन्हाला न जुमानता भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले. दुपारी 3 वाजेपर्यंत भंडारा-गोंदिया मतदारसंघ 45.88 टक्के मतदान पार पडले.
याशिवाय नागपूर लोकसभा मतदारसंघात 38.42 टक्के आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 40.10 टक्के मतदान पार पडले. त्याशिवाय नागपूर विभागातील 5 लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 44.12 टक्के मतदान पार पडलं. याशिवाय रामटेक लोकसभा मतदारसंघात 40. 10 टक्के, नागपूर लोकसभा मतदारसंघात 38.43 टक्के, भंडारा लोकसभेत 45.88 टक्के, गडचिरोली लोकसभेत 55.79 टक्के, चंद्रपूर लोकसभेत 43.48 टक्के मतदान पार पडले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world