जाहिरात

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश

महाडमध्ये सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश
महाड:

निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे दौऱ्यावर आहेत. बुधवारपासून त्या कोकणदौऱ्यावर आहेत. गुरुवारी रात्री महाडची सभा करून ते मुक्कामी राहिल्या होत्या. आज कोकणात दोन ते तीन सभा असल्याकारणाने त्या निघण्याच्या तयारीत होत्या. दरम्यान महाडमध्ये त्यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

आज सकाळी सुषमा अंधारे हेलिपॅडजवळ हेलिकॉप्टरची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. याबाबत अंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडहून त्या कोकणातील काही सभांसाठी निघाल्या होत्या. त्या हेलिपॅडजवळ उभ्या असताना हेलिकॉप्टरने काही वेळ आकाशात घिरट्या घेतल्या आणि त्यानंतर धुळीचे लोट दिसले. काही वेळाने हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं कळालं. सुदैवाने या अपघातात पायलट सुखरूप असल्याची माहिती आहे. 

बातमी अपडेट होत आहे. 
 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे', खडसेंचं बाप्पाला साकडं
सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश
Wardha Lok Sabha Election Will Ramdas Tadas get a hat trick
Next Article
रामदास तडस यांची हॅटट्रिक की क्लिन बोल्ड? वर्ध्यात कुणाचा बोलबाला?