'मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर...' अजित पवार जाहीर पणे बोलले

जाहिरात
Read Time: 2 mins
शिरूर:

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला डावललं, संधी दिली नाही ही सल अजित पवारांना आहे. ती त्यांनी आता जाहीर पणे बोलून दाखवली आहे. शिरूर इथं शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांबाबतचे अनेक खुलासे केले. त्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवार गटाकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळेल अशी चर्चा आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'मी मुलगा नाही म्हणून...'

शरद पवारांचे वय झाले आहे. ते 80 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांनी कुठे तरी थांबलं पाहीजे ही आपली भूमिका होती. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आशिर्वाद द्या असे सांगत होते.  तेही कधी कधी मी आता निवृत्त होणार असे म्हणायचे. मात्र त्यांनी प्रत्यक्षात असं काहीच केले नाही. त्यांच्या मनाला वाटतं तेच ते करत असतात असा आरोपही अजित पवार यांनी केली. शिवाय आपण त्यांचा मुलगा नाही. त्यामुळेच आपल्याला संधी मिळाली नाही. जर मी त्यांचा मुलगा असतो तर आपल्याला संधी मिळाली असती असेही अजित पवार जाहीर पणे म्हणाले. ते सांगत होते तसं मी करत होतो. त्यावेळी एक शब्दही मी उच्चारत नव्हतो असंही त्यांनी सांगितलं. 

हेही वाचा - 'तुम्ही तुमचं पुणे बघा, आम्ही बारामती बघतो' दादा दादांवर का भडकले?
     
भाजपबरोबर जाण्याचा निर्णय शरद पवारांचाच 

भाजप बरोबर जाण्याचा निर्णय हा शरद पवारांनीच घेतला होता. त्याबाबतच्या सहा बैठकाही दिल्लीत झाल्या होत्या. याची कल्पना प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस यांना होती असेही ते म्हणाले. मात्र मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी आपल्याला शिवसेना काँग्रेस बरोबर जायचं आहे असं सांगितलं. शरद पवारांना जो निर्णय घ्यायचा असतो तोच निर्णय ते घेतात. मात्र दाखलताना हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे असं दाखलतात असेही सांगितले. 

Advertisement

हेही वाचा - शरद पवारांची 'राष्ट्रवादी', काँग्रेसमध्ये विलीन होणार? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले

अमोल कोल्हेंवर हल्लाबोल 

यावेळी अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला. कोल्हेंना मी निवडून आणले. ते निवडून आल्यानंतर राजीनामा देणार होते. आपल्याला हे जमणार नाही असे सांगत होते. त्यांना राजीनामा देऊ नका म्हणून मी थांबवले होते असे अजित पवारांनी सांगत कोल्हेंना लक्ष्य केले. शिवाय आढळराव पाटील यांनी त्यांच्या खासदारकीच्या कारकीर्दीत चांगले काम केल्याचेही सांगितले.

Advertisement