जाहिरात
This Article is From May 09, 2024

'तुम्ही तुमचं पुणे बघा, आम्ही बारामती बघतो' दादा दादांवर का भडकले?

'तुम्ही तुमचं पुणे बघा, आम्ही बारामती बघतो' दादा दादांवर का भडकले?
पुणे:

अजित पवार हे आपल्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. बारामतीत नुकतेच मतदान पार पडले. त्यानंतर अजित पवारांनी आपल्या मनातली एक गोष्टी जाहीर पणे बोलून दाखवली. बारामतीच्या प्रचारा दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐवढच नाही तर त्या वक्तव्यानंतर आपण चंद्रकांत पाटील यांना तुम्ही तुमचं पुणं बघा आणि बारामती बघतो असे सांगितले होते. शिवाय त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे होते. त्यानी तसे बोलायला नको होते असंही अजित पवार म्हणाले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चंद्रकांत पाटील काय म्हणाले? 

बारमती लोकसभेच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील हे बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांचा पराभव करा. त्यांचा पराभव झाला पाहीजे. त्यांचा पराभव हवा आहे. अशा पद्धीतीचे वक्तव्य केले होते. बारामतीमध्ये जाऊन त्यांना हे आवाहन केले. पवारां विरोधात केलेले हे वक्तव्य बारामती करांना तेवढे भावले नाही, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे त्याचाही फटका महायुतीच्या उमेदवाराला बारामतीत बसला याची जोरदार चर्चा सुरू आहे. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.   

हेही वाचा - शरद पवारांची 'राष्ट्रवादी', काँग्रेसमध्ये विलीन होणार? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले

अजित पवारांनी दादांना काय सांगितलं? 

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी आक्षेप घेता होता. चंद्रकांत पाटील असे बोलून का गेले हे माहित नाही.पण ते चुकीचे बोलले. त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते. शरद पवारांचा पराभव करण्यासाठी ते काही निवडणुकीला उभे होते का असा प्रश्न त्यांनी पाटील यांना केला. पराभव हा सुनेत्रा पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या पैकी होणार आहेत. त्यात पवार साहेबांना का ओढले अशी विचारणाही त्यांनी केली. त्यामुळे त्यांना आपण तुम्ही पुणे सांभाळा आणि बारामती सांभाळतो असे अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले. त्यानंतर पाटील बारामतीकडे फिरकले नाहीत असेही दादांनी सांगितले.

हेही वाचा - फलक लावला, जाहीर रजा मागितली; मुश्रीफ निघाले फॉरेनला, सोबत कोण कोण?

बारामतीत चुरशीची लढत 

बारामतीत लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले आहे. जवळपास 59 टक्के मतदानाची नोंद या मतदार संघात झाली. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत इथे होती. राज्यातल्या चुरशींच्या लढती पैकी ही एक लढत होती. शरद पवार आणि अजित पवारांसाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com