जाहिरात
This Article is From Apr 17, 2024

'मार्क माय वर्ड...', इम्तियाज जलील यांच्या दाव्याने विरोधकांचं टेन्शन वाढणार

सर्व जाती-धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत.  एका सकारात्मक बदल या जिल्ह्यात दिसून येत आहे, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. 

'मार्क माय वर्ड...', इम्तियाज जलील यांच्या दाव्याने विरोधकांचं टेन्शन वाढणार
छत्रपती संभाजीनगर:

छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे येथून त्यांच्या विरोधात आहे. मात्र महायुतीकडून उमेदवार कोण असेल अजूनही निश्चित होताना दिसत नाही. दरम्यान इम्तियाज जलील यांनी 'मार्क माय वर्ड' म्हणत मीच येथून निवडून येणार असल्याची दावा केला आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा इम्तियाज जलील यांना होईल असं म्हटलं जात आहे. यावर बोलताना इम्तियाज जलील यांनी म्हटलं की, मार्क माय वर्ड्स (माझे शब्द लिहून ठेवा) हिंदू मतांचं विभाजन होणार म्हणून इम्तियाज जलीलला फायदा होईल असं नाही.

'अब की बार 400 पार', होणार का? NDTV च्या पोल ऑफ पोल्सची आकडेवारी काय सांगते?

कारण या जिल्ह्यात एक परिवर्तन मला पाहायला मिळत आहे. तरुणाईने इम्तियाज जलीलला मतदान करुन निवडून आणण्यात निर्धार केला आहे. सर्व जाती-धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत.  एका सकारात्मक बदल या जिल्ह्यात दिसून येत आहे, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. 

महायुतीला छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवार मिळेना

महायुतीने अद्याप येथून आपला उमेदवार घोषित केलेला नाही. याबाबत बोलताना इम्तियाज जलील यांनी म्हटलं की, आम्ही अनेक दिवसांपासून आमच्या विरोधात कोण असेल याची वाट पाहत आहेत. भाजप दावा करत आहे आम्ही राज्यात 48 पैकी 45 जागा जिंकू, मात्र तरीही त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवार मिळत नाहीये. आधी सांगितलं की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही आमचा उमेदवार घोषित करु.  तेव्हा केलं नाही.

ठाण्याचा 'नायक' ठरला? शिंदेंचा जवळच्या नेत्या सिग्नल मिळाला?

आज रामनवमीच्या दिवशीतरी उमेदवाराची घोषणा करतील, अशी आशा आहे.  अमित शाह यांनी संभाजीनगरमध्ये येऊन MIMला थेट आव्हान दिलं होतं. मात्र महिना उलटला तरी उमेदवार मिळत नाही, अशी काय अडचण आहे, हे तरी सांगा, असा टोलाही जलील यांनी महायुतीला लगावला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com