Chhatrapati Sambhajinagar News: किर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून किर्तनकाराला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. नेमकं काय घडलं? वाचा....
किर्तनकाराला घरात घुसून बेदम मारहाण!
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात कीर्तनकाराला घरात घुसून जमावाकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनामध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे काही जण संतप्त झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी जमाव करून कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली.
Satara News: सहावीच्या विद्यार्थिनींनी दहावीचे पेपर तपासले? CCTV समोर, साताऱ्यात खळबळ
या वेळी घरात त्यांची पत्नी, मुलगी तसेच आई-वडील उपस्थित होते. मारहाणीच्या गोंधळात त्यांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मारहाणीनंतर महाराजांनी व्हिडिओद्वारे जाहीर माफीही मागितली. माझ्याकडून चुकून वादग्रस्त वक्तव्य बोलले गेले, त्याबद्दल मी माफी मागतो, मात्र माझ्या कुटुंबावर, माझ्यावर अशाप्रकारे हल्ला करणे योग्य नाही. कायदेशीर कारवाई करायला हवी होती, असं ते म्हणाले.
काय म्हणाले होते महाराज?
काही दिवसांपूर्वीच चंद्रग्रहण लागले होते. या चंद्रग्रहणादरम्यान सांगलीमधील एका गर्भवती महिलेने पालेभाज्या, फळे चिरून खात या सर्व अंधश्रद्धा असल्याचा संदेश दिला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरुनच बोलताना निवृत्ती महाराजांनी टीका केली होती. ती महिला आपल्या धर्माची नव्हती, ती दुसऱ्या धर्माची होती. त्यामुळे तुम्हाला आमच्या धर्मावर आक्षेप घेण्याचा मुळीच अधिकार नाही, असं महाराज म्हणाले होते. महाराजांच्या याच वक्तव्यावरुन हा वाद झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world