'हा टपरीवाला 23 तारखेनंतर परत टपरीवर जाणार' राऊतांनी गुलाबरावांना झोडपून काढलं

वर्षा बंगल्यावर हे महाशय आले. त्यावेळी त्यांनी मला पण जावं लागेल असं सांगितलं. त्याचं कारण सांगताना म्हणाले माझ्या मागे ईडी लागेल असं सांगितलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
जळगाव:

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण मतदार संघ हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. या बालेकिल्ल्यात संजय राऊत यांनी पाटील यांनी जोरदार ठोकून काढलं. त्यांचा उल्लेख टपरीवाला असा करत 23 तारखेनंतर हा टपरीवाला परत टपरीवर जाणार असे वक्तव्य संयय राऊत यांनी केले. हा टपरीवाला परत या मतदार संघात दिसता कामा नये असंही ते यावेळी म्हणाले. मविआचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी ते आले होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुलाबराव पाटील बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे आमदार मंत्री झाले. एका टपरीवाल्याला बाळासाहेबांनी आमदार बनवलं. पण त्याने गद्दारी केली. त्यामुळे 23 तारखेनंतर हा टपरीवाला परत टपरीवरच जाणार असं ते म्हणाले. अनेक टपरीवाल्यांना बाळासाहेबांनी आमदार खासदार मंत्री केलं. पण हा टपरीवाला लायकीवर गेला. आता आपली जबाबदारी आहे. हा परत या मतदार संघात दिसता कामा नये, असे आवाहन त्यांना यासभेत केले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री येती घरी, खड्डे भरणीचा मुहूर्त ठरी!; अंबरनाथकरांमध्ये रंगली चर्चा

संपूर्ण महाराष्ट्रात एक तुफान आलेलं दिसत आहे. हे महाविकास आघाडीचं तुफान आहे असं राऊत म्हणाले. शिवाय शिवसेना ही एकच.. गद्दारांची शिवसेना शिवसेना नाही. खुद्दारांची शिवसेना निष्टावंतांची शिवसेना आपली आहे. जो पर्यंत निष्ठावंतांची फौज आपल्या बरोबर तो पर्यंत कोणी आपली सेना चोरू शकत नाही असे राऊत यावेळी म्हणाले. ही जागा शिवसेनेची असतानाही आपण ती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिली. कारण गुलाबराव देवकर यांना त्या गुलाबरावला लोळवण्याचा अनुभल आहे. त्यामुळेच हा पैलवाना  मैदानात आणला असे राऊत म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - जेंव्हा काँग्रेस अध्यक्षांच्या आईला निजामाच्या सैन्यानी जाळलं, योगींच्या भाषणानंतर जागा झाला इतिहास

या विधानसभा निवडणुकीनंतर हा टपरीवाला विधानसभेत दिसणार नाही. हा मतदार संघ तू काय विकत घेतला नाही असं राऊत यांनी ठणकावलं आहे.  ही बाळासाहेबांची पुण्याई आहे. त्यामुळे इकडं तू वीस बावीस वर्ष टिकला असं राऊत म्हणाले. हे पाणी पुरवठा मंत्री आहेत. पण यांना यांच्या गावात लोकांना पाणी देता आलं नाही. हे मात्र संध्याकाळी पाणी घेतात. ते पण बिस्लरीचं अशी शब्दात राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचा समाचार घेतला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'गद्दार गद्दार'च्या घोषणा, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला अन् थेट गाठलं काँग्रेस कार्यालय; पुढे काय घडलं? 

एकनाथ शिंदे पळून गेले होते. त्यावेळची या गुलाबरावती मी गंम्मत सांगतो असे राऊत म्हणाले. हा माणूस निष्ठेच्या गप्पा मारायचा. मीच निष्ठावान असं सांगायचे. दसरा मेळाव्यात आम्हीच यांना भाषण करायला द्यायचो. छाती ठोकून सांगायचा मी किती निष्ठावान आहे ते. पण एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडत होता. सर्व जण विकले जात होते. त्यावेळी वर्षा बंगल्यावर हे महाशय आले. त्यावेळी त्यांनी मला पण जावं लागेल असं सांगितलं. त्याचं  कारण सांगताना म्हणाले माझ्या मागे ईडी लागेल असं सांगितलं. कारण त्यांच्या अकाऊंटमध्ये एका ठेकेदाराने पाच कोटी पाठवले होते. त्याची चौकशी लागू शकते असं सांगितलं. त्यावर तुम्ही गांडूगिरी करू नका अशा शब्दात आपण त्यांना सुनावलं होतं असं राऊत यांनी सांगितलं.