अमजद खान, कल्याण
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मुरबाडमधील भाजपचे आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जगन्नाथ पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. भिवंडी लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप त्यांना पत्रात केला आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाले होते.
(नक्की वाचा- उद्धव ठाकरे लोकसभेच्या निकालानंतर मोदी सरकारमध्ये सामील होतील, रवी राणा यांचा मोठा दावा)
BJP Letter
जगन्नाथ पाटील यांना आपल्या पत्रातून आरोप केले की, किसने कथोरे यांनी कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी ज्या ठिकाणी आगरी समाजाची गावे आहेत तिथे तुतारीला मतदान करा. जेथे कुणबी समाजाची गावे आहेत तेथे निलेश सांबरे या अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याची सक्त ताकीद कार्यरर्त्यांना दिली होती. अशा 100 कार्यकर्त्यांची यादी तयार आहेत.
(नक्की वाचा - निवडणूक निकालानंतर राष्ट्रीय स्तरावर भाजपमध्ये मोठे फेरबदल)
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला कथोरे यांनी काडीचीही किंमत दिली नाही. पक्षाचे आदेश त्यांनी धुडकावून लावले. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप असंतोष आहे. पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी सर्व शक्ती कथोरे यांनी पणाला लागली. त्यामुळे आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी जगन्नाथ पाटील यांनी केली.