जाहिरात

Jalgaon Municipal Election 2026 : ते आले अन् जिंकले; भाजपमधील नाराजीनंतर पती-पत्नी उमेदवार विजयी

जयश्री महाजन आणि  सुनील महाजन यांना भाजपमध्ये घेतल्याने भाजपच्या राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर उमटला होता.

Jalgaon Municipal Election 2026 : ते आले अन् जिंकले; भाजपमधील नाराजीनंतर पती-पत्नी उमेदवार विजयी

मंगेश जोशी, प्रतिनिधी

BMC Election Result 2026 : महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निकालाचे कल हळू हळू समोर येत आहेत. बहुतांश सर्वच महानगरपालिकांमध्ये भाजपची सरशी आहे. मुंबईसह पुणे महानगरपालिकांच्या निकालांमध्ये भाजपच्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. भाजपने २०१७ च्या तुलनेत मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गटाने भाजपला कडवी झुंज दिली आहे. मात्र तरीही ठाकरे गटाला फारशा जागा दिसून येत नाहीये. 

जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर जयश्री महाजन आणि शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन विजयी झाले आहेत. जयश्री महाजन आणि सुनील महाजन हे पती-पत्नी आहेत. विधानसभा निवडणुकीत जयश्री महाजन यांनी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटातून निवडणूक लढवली होती.

दादरमध्ये चक्र फिरलं! सदा सरवणकरांचे पूत्र समाधान सरवणकरांचा दारुण पराभव; ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी

नक्की वाचा - दादरमध्ये चक्र फिरलं! सदा सरवणकरांचे पूत्र समाधान सरवणकरांचा दारुण पराभव; ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी

जयश्री महाजन आणि  सुनील महाजन यांना भाजपमध्ये घेतल्याने भाजपच्या राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर उमटला होता. मात्र ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या महाजन पती-पत्नींसाठी हा प्रवेश लकी ठरला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com