'मोदी गॅरंटी'ला 'केजरीवाल गॅरंटी'चं आव्हान; अरविंद केजरीवाल यांची 10 मोठी आश्वासने

Arvind Kejriwal guarantee : भारताला मजबूत करणारी ही कामे आहेत आणि पुढील पाच वर्ष यासाठी युद्धपातळीवर काम केलं जाईल, असंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. 

Advertisement
Read Time: 2 mins

भाजपच्या 'मोदी गॅरंटी'नंतर आता आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी देखील 10 गॅरंटीची दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना 10 मोठी आश्वासने दिली आहेत. देशातील गरीब जनतेला मोफत वीज देण्याची घोषणा याशिवाय शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य, रोजगार, भ्रष्टाचारसंबंधित 10 आश्वासने अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. 

अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, आमचं सरकार आलं तर मोफत वीज, दर्जेदार शाळा, मोहल्ला क्लिनीक सुरु करणार. आम्ही याआधी जी आश्वासने दिली ती पूर्ण केली. मोदींची गॅरटी कोण पूर्ण करेल याची देखील गॅरंटी नाही. कारण 75 वर्षांचे झाल्यावर ते रिटायर होणार आहेत. मात्र केजरीवालची गॅरंटी केजरीवाल पूर्ण करेन, असंही त्यांनी म्हटलं. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंडिया आघाडीची सरकार बनलं तर या सर्व गॅरंटी आम्ही पूर्ण करु. हे भारताचं व्हिजन आहे. भारताला मजबूत करणारी ही कामे आहेत आणि पुढील पाच वर्ष यासाठी युद्धपातळीवर काम केलं जाईल, असंही केजरीवाल यांनी सांगितलं. 

अरविंद केजरीवाल यांच्या 10 गॅरंटी

शेतकऱ्यांना गॅरंटी
शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगानुसार सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करणार. 

दर्जेदार शिक्षण
प्रत्येक गावात आणि परिसरात दर्जेदार शाळा सुरु करणार. प्रत्येक मुलाला उत्तम आणि मोफत शिक्षण मिळण्याची व्यवस्था करणार.

(नक्की वाचा - अधिकृत विरुद्ध बंडखोर! जळगावमध्ये भाजप समोर बंडखोर भाजप उमेदवाराचेच आव्हान)

मोफत वीज 
देशात 24 तास वीजेची व्यवस्था करणार. कुठेही लोड शेडिंग होणार नाही. गरीबांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत देणार. 

अग्निवीर योजना बंद करणार
अग्निवीर योजन बंद करुन जुन्या पद्धतीनुसार सैन्य भरती केली जाणार. भरती झालेल्या अग्निवीरांना कायमस्वरुपी सैन्यात घेतलं जाणार.

Advertisement

मोफत उपचाराची व्यवस्था
प्रत्येक गावात आणि भागात मोहल्ला क्लिनीक सुरु करणार. जिल्हापातळीवर चांगले सरकारी रुग्णालये उभारणार. 

बेरोजगारी दूर करणार
बेरोजगारी योग्य नियोजन करुन दूर केली जाईल. पुढील एक वर्षात 2 कोटी रोजगार उपलब्ध करणार. 

(नक्की वाचा - पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात होणार खडाजंगी? आमने-सामने मुकाबल्यासाठी काँग्रेस तयार)

चीनकडून जमीन पुन्हा मिळवणार
चीनने कब्जा केलेली जमीन पुन्हा भारतात आणणार. लष्कराला योग्य पावले उचलण्यासाठी सर्व सूट देणार. 

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा
दिल्लीला पूर्ण राज्यात दर्जा मिळवून देणार.

भ्रष्टाचार मुक्त भारत
भाजपची वॉशिंग मशीन बंद करणार. भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण आणि इमानदारांना जेल ही पद्धत बंद करणार. 

व्यापाऱ्यांना सूट
जीएसटीमध्ये योग्य सुधारणा करुन अशी व्यवस्था निर्माण करणार की व्यापाऱ्यांना लाभ होईल. जीएसटीला PMLA मधून बाहेर केलं जाणार.

Topics mentioned in this article