जाहिरात

Kerala Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केरळ निवडणुकीत किती मतं? आकडा पाहून डोक्यावर हात माराल

त्यामुळे महाराष्ट्रा बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला आपला करिष्मा दाखवता आला नाही.

Kerala Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केरळ निवडणुकीत किती मतं? आकडा पाहून डोक्यावर हात माराल
  • केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून दहा वर्षांनंतर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे
  • अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केरळमध्ये निवडणूक लढवली पण कोणतीही जागा जिंकली नाही व डिपॉझिटही जप्त
  • शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डाव्या पक्षांसोबत आघाडी केली तरीही तीन विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. केरळमध्ये काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेस केरळमध्ये सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झाले आहे. तर डाव्या पक्षांना विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ही आपले नशिब आजमावले होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या या पहिल्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. पण त्यांच्या हाती फार काही लागलं नाही. ते आपलं डिपॉझिट ही वाचवू शकले नाहीत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची स्थिती ही काही वेगळी नव्हती. त्यांचे विद्यमान तीन ही आमदार पराभूत झाले. त्यात एका मंत्र्याचाही समावेश आहे. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केरळमध्ये काही जागा लढवल्या होत्या. त्यात त्यांना एकाही जागेवर विजय मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण केरळमधून फक्त 692 मतं मिळाली आहे. मतांची टक्केवारी ही 0.00 टक्के राहीली आहे. त्यामुळे महाराष्ट्रा बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला आपला करिष्मा दाखवता आला नाही. अजित पवारांच्या निधनानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यात मोठा फटका पक्षाला बसलेला दिसत आहे. उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेली मतं ही किती तरी पटीने जास्त आहे. 

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - TVK Chief Vijay: विजयच्या शपथविधीला राज्यपालांचा रेड सिग्नल? बहुमता भोवती अडकला गेम, शपथविधी लटकणार?

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डाव्या पक्षांसोबत आघाडी केली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागा सोडण्यात आल्या होत्या. त्या पैकी एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता आला नाही. पण त्यांना 1लाख 47 हजार 799 मतं मिळाली आहे. एकूण मतांच्या 0.68 टक्के मतं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत. अजित पवारां पेक्षा शरद पवारांच्या पक्षाने केरळमध्ये सरस कामगिरी केली आहे.  पक्षाचे तीन ही विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत. त्यात एका मंत्र्याचा ही समावेश आहे. काँग्रेसच्या लाटेत दोन्ही पवारांच्या पक्षाला केरळमध्ये फटका बसला आहे. त्याची चर्चा आता महाराष्ट्रात ही होत आहे. 

नक्की वाचा - Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट

केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीने जबरदस्त बहुमत मिळवले आहे. डाव्या पक्षाच्या सरकारचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. केरळमध्ये काँग्रेस दहा वर्षानंतर सत्तेत येत आहे. काँग्रेस ला सर्वाधिक 28.79 टक्के मतं केरळमध्ये मिळाली आहेत. काँग्रेसने केरळमध्ये सत्ता स्थापनेचा दावा ही केला आहे.लवकरच पक्षाचा विधीमंडळ पक्षनेता निवडला जाणार आहे. केरळ निवडणुकीत महाराष्ट्रातले दोन पक्ष उतरले असताना त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठ धक्का लागलेला पाहायला मिळत आहे.एकीकडे सुनेत्रा पवारांनी बारामतीत रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यांनी विजय नोंदवला. तर दुसरीकडे केरळमध्ये मात्र त्यांच्या पक्षाचा सुफडा साफ झाल्याचं पाहायला मिळालं.    

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com