जाहिरात

Kolhapur News : बाभळीला दाभणाने लटकवले मुलींचे फोटो अन् काळ्या बाहुल्या; कोल्हापुरातील ते दृश्य पाहून गावकरी हादरले!

कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील एका प्रेमवीराने तरुणींनी आकर्षित करण्यासाठी अघोरी कृत्याचा आधार (Superstition) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Kolhapur News : बाभळीला दाभणाने लटकवले मुलींचे फोटो अन् काळ्या बाहुल्या; कोल्हापुरातील ते दृश्य पाहून गावकरी हादरले!

Kolhapur Crime : एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी तरुणांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. कोणी तरुणीच्या आवडत्या वस्तू आणतो, कोणी तिला आवडणाऱ्या गोष्टी करतो. कसंही करून त्या तरुणीचं लक्ष वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असतो. मात्र कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील एका प्रेमवीराने तरुणींनी आकर्षित करण्यासाठी अघोरी कृत्याचा आधार (Superstition) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे दृश्य पाहून गावकऱ्यांनाही धक्का बसला. आकुर्डे-महालवाडी दरम्यान असलेल्या एका शेतात हा अघोरी प्रकार दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरांकडून हे अघोरी कृत्य करण्यात आलं आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातील हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Pune Crime : आई घराबाहेर जाताच नराधम बाप लेकीच्या जवळ...; नांदेड सिटीतील घटनेने पुणे पुन्हा हादरलं!

नक्की वाचा - Pune Crime : आई घराबाहेर जाताच नराधम बाप लेकीच्या जवळ...; नांदेड सिटीतील घटनेने पुणे पुन्हा हादरलं!

या प्रकरणात बाभळीच्या झाडाला दाभणाने मुलींचे फोटो लटकवण्यात आले आहेत. याशिवाय तरुणींच्या ड्रेसची बटणंही या दाभणात लावण्यात आली आहे. यामध्ये लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचाही वापरही करण्यात आला आहे. या झाडावर एका तरुणीसह तिची आई, वडील आणि आजीचे फोटो लटकवल्याचं दिसून आलं.  भुदरगड तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. आकुर्डे-महालवाडी दरम्यानच्या कुराण नावाच्या शेतातील गवताच्या माळावर हा अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. हा प्रकार कोणी केला त्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: