निलेश राणेंबाबत वैभव नाईक यांचे मोठ वक्तव्य, राणे पलटवार करणार?

कुडाळ मालवण मतदार संघात नारायण राणे यांच्या पराभवानंतर राणे कुटुंबातील व्यक्ती दहा वर्षानंतर या मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
सिंधुदुर्ग:

कोकणात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात होत आहे. या मतदार संघात नारायण राणे यांच्या पराभवानंतर राणे कुटुंबातील व्यक्ती दहा वर्षानंतर निवडणूक रिंगणात उतरणार आहे. इथे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक विरूद्ध शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे यांच्यात थेट लढत होत आहे. या निमित्ताने वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यासह निलेश राणे यांनाही लक्ष केले आहे. मागिल दोन निवडणुकीत आपले मताधिक्य वाढले आहे. यावेळीही त्यात वाढ होईल असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वैभव नाईक यांनी आपल्याला मतदार संघात जनतेचा पाठींबा आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्क्याने आपण निवडून येवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मी जे काम केल आहे ते लोकांसमोर आहे. त्यामुळे जनतेच्या पाठिंब्यावर मी पुन्हा निवडून येईन असे ते म्हणाले. एखादा कार्यकर्ता संघर्षातून काम करतो. त्या कामाची किंमत कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून स्वतःच्या मुलांसाठी काम करतात त्याना समजणार नाही असा टोला त्यांनी या निमित्ताने नारायण राणे यांना लगावला आहे.  

ट्रेंडिंग बातमी - चला उमेदवारी अर्ज भरायला! 'हे' दिग्गज भरणार आज उमेदवारी अर्ज

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष केले. मुख्यमंत्री- माजी मुख्यमंत्र्यांना इथे यावं लागलं. ह्यातच माझा विजय आहे असे वैभव नाईक म्हणाले. हे विकासाठी कधी एकत्र आले नाहीत. केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला. राणे केवळ आपली संपत्ती दोन्ही मुलांनी सांभाळावी म्हणून लढत आहेत. पहिले सरंमजामशाही होती. जनतेने लोकशाहीच्या मार्गाने ती नष्ट केली. मी सामान्य जनतेसाठी लढतोय. पण राणे आपल्या मुलांना सेटल करण्यासाठी लढत आहेत, असा आरोपही त्यांनी या निमित्ताने केला.  

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थी, अंबरनाथमधला पेच सुटला? किणीकर -वाळेकर वाद मिटला

निलेश राणे आणि उदय सामंत यांच्यात वाद आहे. त्यांचा वाद हा पदासाठी स्वार्थासाठी होता. आता हा वाद पद आणि सत्तेसाठी थांबला आहे. उदय सामंत यांनी उद्योग मंत्री असताना कोणता उद्योग कोकणात आणला हे कोणालाच माहित नाही. उद्धव ठाकरे  सोबत गद्धारी करुन दुसऱ्या पक्षात गेलात, त्याचे उत्तर सामंत यांनी दिले पाहीजे असेही ते म्हणाले. मालवण विधानसभा मतदार संघात राणे विरूद्ध नाईक अशी थेट लढत होत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेला महायुती किती कोटीचा चुराडा करणार? पवारांनी थेट आकडा सांगितला

ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. मागिल दोन विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक हे आमदार झाले आहेत. राणे यांचा हा एकेकाळी गड होता. त्या गडाला वैभव नाईक यांनी सुरूंग लावला होता. एकद तर त्यांनी नारायण राणे यांचाच पराभव केला. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आता निलेश राणे हे मैदानात उतरले आहे. पण निलेश राणे यांनाही आस्मान दाखवणार असा पण वैभव नाईक यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघातून नारायण राणे यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. ही बाब वैभव नाईक यांच्यासाठी चिंतेची आहे.