जाहिरात

चला उमेदवारी अर्ज भरायला! 'हे' दिग्गज भरणार आज उमेदवारी अर्ज

या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक दिग्गज सरसावले आहेत. यावेळी शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

चला उमेदवारी अर्ज भरायला! 'हे' दिग्गज भरणार आज उमेदवारी अर्ज
मुंबई:

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे ही जाहीर केली आहेत. त्यात आजचा दिवस हा  गुरुपुष्यामृत (Gurupushyamrut yoga October 2024) योगाचा आहे. त्यामुळे या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक दिग्गज सरसावले आहेत. यावेळी शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यात आदित्य ठाकरे, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील यांचा यात समावेश आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणत उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आजच्या दिवशी अर्ज दाखल करणार आहेत. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित राहाणार आहेत. यावेळी शिवसेनेकडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. या शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतक पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर मुंब्रा मतदार संघातून शरद पवार गटाचे  जितेंद्र आव्हाड ही अर्ज दाखल करणार आहे. तासगाव विधानसभा मतदार संघातून शरद पवार गटाचे रोहित पाटीलही आजच अर्ज दाखल करणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील. कोल्हापुरातून समरजीत घाडगेही उमेदवारी दाखल करतील. 

ट्रेंडिंग बातमी - आधी 5 कोटी आता 13 लाखाची रोकड जप्त, पुण्यात झाली कारवाई

त्याच बरोबर ठाणे शहर मतदार संघातून  मनसेचे अविनाश जाधव हे अर्ज दाखल करतील. यावेळी पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. शिवाय ठाकरे गटाचे राजन विचारे ही याच मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या शिवाय भाजपचेही काही उमेदवारी आजच अर्ज दाखल करणार आहेत. शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील उमेदवारी दाखल करतील. त्यात कोथरुडमधून भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.सांगलीत भाजपाचे सुधीर गाडगीळ  मोठी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कडेगावमध्ये भाजपाचे संग्राम देशमुख अर्ज भरतील. तर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भाजपाकडून इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य हे आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?

 राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून धनंजय मुंडे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्याच वेळी येवला मतदारसंघातून छगन भुजबळ अर्ज दाखल करणार आहेत. तर आंबेगावमधून मंत्री दिलीप वळसे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादीचे अतूल बेनके, अशोक पवार, सुनिल शेळके हेही आजच उमेदवारी अर्ज दाखल करतील. काँग्रेसने अजूनही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. असे असले तरी आजच्या मुहूर्तावर काँग्रेसचे संग्राम थोपटे, जत मधून  विक्रम सावंत अर्ज दाखल करणार आहेत. शिवाय  तिवसा या मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्या  माजी मंत्री यशोमती ठाकुर उमेदवारी अर्ज दाखल करतील.

ट्रेंडिंग बातमी -  सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीची पहिली यादी आली, कोणाला उमेदवारी कोणाला वगळलं?

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर ही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर माढ्यातून आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लातूर शहरातून वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपाचे नेते अतुल भातखळकर, बंटी भांगडीया, समीर कुणावर हे आज उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. तर दर्यापूरातून शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ उमेदवारी अर्ज दाखल करतील. धामणगाव रेल्वेतून भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड अर्ज दाखल करणार आहेत.

ट्रेंडिंग बातमी - Live Update : शक्तिप्रदर्शन अन् आव्हान!  आज गुरुपुष्यामृत योगानिमित्ताने मविआ-महायुतीचे अनेक उमेदवार अर्ज भरणार 

याशिवाय धनराज महाले (दिंडोरी), संग्राम जगताप (अहमदनगर), राणी लंके (पारनेर), मिहीर कोटेचा (भांडुप पश्चिम), मंगलप्रभात लोढा (मलबार हील), कालीदास कोळंबकर (अँटॉप हील), किरण सामंत (राजापूर), राजन साळवी (उद्धव ठाकरे शिवसेना ) (राजापूर) हे सुद्धा आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दापोलीमधून शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश कदम, गुहागरमधून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे भास्कर जाधव, चिपळूणमधून शरद पवारांच्या पक्षाचे प्रशांत यादव उमेदवारी अर्ज आज दाखल करतील. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले भरणार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच  अकोलेचे डॉ. किरण लहामटेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Previous Article
आधी 5 कोटी आता 13 लाखाची रोकड जप्त, पुण्यात झाली कारवाई
चला उमेदवारी अर्ज भरायला! 'हे' दिग्गज भरणार आज उमेदवारी अर्ज
ambarnath-assembly-balaji-kinikar-arvind-walekar-dispute-resolved-by-cm-shinde
Next Article
मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थी, अंबरनाथमधला पेच सुटला? किणीकर -वाळेकर वाद मिटला