Dry Day:ड्राय डे विरोधात मद्य विक्रेता संघटनेची उच्च न्यायालयात धाव; आज-उद्या दारु विक्री सुरू राहणार की बंद? 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हात देत मद्य विक्री संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Election 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये आज मतदान होणार आहे. उद्या १६ जानेवारी रोजी मजमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून या भागात मद्यविक्री बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. १४ ते १६ जानेवारी हे तीन दिवस राज्यातील बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हात देत मद्य विक्री संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. १६ जानेवारी, शुक्रवारपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. 

न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने याचा निकाल दिला. असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर व्हेंडर्स या संघटनेने मद्यविक्री बंदी उठविण्याची मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने संघटनेच्या अंतरिम स्थगितीची मागणी फेटाळली आहे. 

नक्की वाचा - Heart Attacks Signs: हार्ट अटॅक अचानक नाही येत; हृदयाच्या डॉक्टरांनी सांगितलं, आधीपासून शरीरात दिसणारे 7 संकेत

किती दिवस मद्यविक्री बंद राहणार?

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मतदानाच्या आधीचा दिवस म्हणजे १४ जानेवारी रोजीही मद्यविक्रीस बंदी होती. आज मतदानाचा दिवस १५ जानेवारी आणि उद्या मतमोजणीचा दिवस १६ जानेवारी रोजी ड्राय डे असेल. म्हणजे १४ ते १६ जानेवारी यादरम्यान राज्यभरातील मद्यविक्रीची दुकानं, बार, परमिट रुम बंद राहतील. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यात बंदी आहे. मुंबई, ठाण्यासह २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होईल आणि १६ जानेवारीला मतमोजणी होईल. 

Advertisement