बारामतीत अजित पवार-शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; सांगता सभेआधीच्या रॅलीतील प्रकार

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या प्रचाराच्या सांगता सभा आज बारामतीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रॅली काढण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रतीक्षा पारखी, पुणे

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष लागले आहे. बारामतीत पहिल्यांदाच पवार कुटुंबिय निवडणुकीत समोरासमोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही गटाचे कार्यकर्ते प्रचार देखील आक्रमकपणे करत आहेत.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रविवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते बारामतीत आमने-सामने आले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या प्रचाराच्या सांगता सभा आज बारामतीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रॅली काढण्यात आली होती.

नक्की वाचा- राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने शारदा प्रांगण येथून मिशन बंगला येथे सांगता सभेच्या स्थळापर्यंत पदयात्रा काढली होती. दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शहरातून सभास्थळापर्यंत बाईक रॅली काढली. या दोन्हीही गटाचे कार्यकर्ते शारदा प्रांगणासमोर आल्यानंतर एकमेकांकडे बघून जोरजोरात घोषणाबाजी करत होते. 

नक्की वाचा - रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, दानवेंनी काय केलं?

रॅली दरम्यान अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपटत डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

Advertisement

Topics mentioned in this article