सूरतनंतर आता इंदूर! काँग्रेस उमेदवारानं घेतला अर्ज मागं

Indore Lok sabha election 2024: मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Indore Lok Sabha इंदूरमधील काँग्रेस उमेदवारानं अर्ज मागे घेतला आहे.
इंदूर:

Lok sabha elections 2024:  मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. येथील काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम (Akshay Kanti Bam) यांनी त्यांचा अर्ज मागं घेतलाय. त्याचबरोबर ते काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. मध्य प्रदेशातील मंत्री आणि भाजपा नेता कैलाश विजयवर्गीय यांनी X वर पोस्ट करत ही माहिती दिलीय. 'इंदूरमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांचे भाजपामध्ये स्वागत आहे,' अशी पोस्ट विजयवर्गीय यांनी केलीय. यापूर्वी गुजरातमधील सूरतमध्येही हाच प्रकार घडला होता. इथं भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.  

इंदूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपाचा वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी काँग्रेसनं अक्षय बम हा नवोदीत चेहरा यंदा रिंगणात उतरवला होता. आता इंदूरमध्ये बाम यांची लढत भाजपाचे सध्याचे खासदार शंकर लालवानी यांच्याशी होणार होती. लालवानी यापूर्वी इंदूर महानगरपालिकेचे सभापती तसंच इंदूर विकास प्राधिकरणाचे (आईडीए) अध्यक्ष होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण आहेत अक्षय बम?

अक्षय बम हे व्यावसायिक असून त्यांचे कुटुंब शहरातील खासगी महाविद्यालय संचालित करतात. ते जैन समाजाचे आहेत. या समाजाचे इंदूर लोकसभा मतदारसंघात जवळपास दोन लाख मतदार आहेत. बम यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अद्याप एकही निवडणूक लढवलेली नाही. 2023 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते, पण त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती.

Advertisement

मतदारांच्या संख्येनुसार इंदूर हा मध्य प्रदेशमधील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. यामध्ये तब्बल 25.3 लाख मतदार आहेत. यंदाची निवडणूक 8 लाखांच्या फरकानं जिंकण्याची घोषणा भाजपानं केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत इंदूरमधून काँग्रेसचा सूपडा साफ झाला होता. त्यामधील एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. 

( नक्की वाचा : दिल्लीत काँग्रेसला झटका; दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा )
 

सूरतमध्ये काय घडलं होतं?

सूरत लोकसभा मतदासंघात काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाला होता. तर अन्य उमोदवारांनी अर्ज मागे घतेला. भाजपाच्या दबावामुळे काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला असा आरोप गुजरात काँग्रेस अध्यक्ष शक्तीसिंह गोहील यांनी केला होता. 

Advertisement
Topics mentioned in this article