![दिल्लीत काँग्रेसला झटका; दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा दिल्लीत काँग्रेसला झटका; दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा](https://i.ndtvimg.com/i/2018-02/rahul-gandhi-and-lovely_650x400_41518860402.jpg?im=FaceCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला दिल्लीत मोठा झटका बसला आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यद अरविंदर सिंह लवली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षासोबत झालेल्या युतीमुळे पदाचा राजीनामा देत असल्याचं लवली यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
काँग्रेसवर आरोप करून आपचं सरकार स्थापन झालं, मग त्यांच्यासोबत युती कशी करता येऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पदाचा राजीनामा देताना त्यांनी लिहिलं की, दिल्ली काँग्रेसने त्या पक्षासोबत युती केली ज्यांनी काँग्रेस पक्षाविरोधात खोटे, भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र तरीही पक्षाने दिल्लीत आपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला.
नक्की वाचा - मणिपूरमध्ये कूकी उग्रवाद्यांचा CRPF च्या ताफ्यावर हल्ला, 2 जवान शहीद
अरविंद सिंह लवली यांना ऑगस्ट 2023 मध्ये दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलं होतं. लवली यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रानुसार, दिल्ली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना AICC सरचिटणीस (दिल्ली प्रभारी) यांनी एकतर्फी विरोध केला आहे. त्यांनी लिहिलं, डीपीसीसी अध्यक्ष म्हणून माझ्या नियुक्तीनंतर AICC महासचिव यांनी मला डीपीसीसीमध्ये कोणतीही वरिष्ठ नियुक्ती करण्याची परवानगी दिली नाही. DPCC चे माध्यम प्रमुख म्हणून अनुभवी नेत्याची नियुक्ती करण्याची माझी विनंती स्पष्टपणे नाकारण्यात आली. आज AICC सरचिटणीस (दिल्ली प्रभारी) यांनी DPCC ला शहरातील सर्व ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती करण्याची परवानगी दिली नाही. परिणामी दिल्लीतील 150 पेक्षा जास्त ब्लॉक्समध्ये सध्या ब्लॉक अध्यक्ष नाहीत.
याशिवाय लवली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपने काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानंतरही त्यांच्यासोबत युती करण्यात आली. काँग्रेस पक्षावर खोटे, भ्रष्टाचाराचे आरोप लावणाऱ्यांसोबत युती करण्यासाठी दिल्ली काँग्रेस युनिटचा विरोध होता. महत्त्वाचं म्हणजे त्याच पक्षाचे अर्धे कॅबिनेट मंत्री सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. मात्र अशाही परिस्थितीत दिल्लीत आपसोबत युतीचा निर्णय घेण्यात आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world