पवारांनी सुप्रिया सुळेंना उमेदवारी द्यायला नको होती, रामदास आठवलेंची स्पष्टोक्ती

सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
बारामती:

बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलं की, पवार विरुद्ध पवार असा सामना व्हायला नको होता. 

अजित पवार आधीपासून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार असल्याचं सांगत होते.  त्यामुळे शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी द्यायला नव्हती पाहिजे. पवार विरुद्ध पवार ही लढाई व्हायला नको होती, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.  

'आता आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, मात्र...'; नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया )

शरद पवार जर महायुतीसोबत आले असते तर संपूर्ण देश सोन्यासारखा झाला असता. शरद पवार हे ॲक्टिव आणि अभ्यासू नेते आहेत.  पण त्यांच्या काही निर्णयांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. बारामतीची निवडणूक म्हणजे काटे की टक्कर आहे.

पवार साहेब आणि अजित पवार दोघांचे समर्थक भरपूर आहेत. मात्र यावेळी अजितदादांसोबत भाजप, शिवसेना, रिपाइं अशी ताकद आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार जिंकतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.  महाराष्ट्रात महायुतीला 45 जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला.  

Advertisement

'सुनेत्रा पवार बाहेरच्या नाही, तर बारामतीकरांच्या मनामनातील सूनबाई' )

सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका चुकीची

शरद पवार यांनी सुनेत्रा यांच्यावर बाहेरच्या पवार अशी टीका केली होती. यावर बोलताना रामदास यांनी ही टीका चुकीची असल्याचं म्हटलं. असंच वक्तव्य त्यांनी सोनिया गांधी यांच्यावरही केलं होतं. आपल्या मुली लग्न करून बाहेर जातात आणि सूना आपल्या घरी येतात. सुनेत्रा पवार यांच्यावर अशी टीका करणे योग्य नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं.