लोकसभा निवडणुकीसाठी नेत्याच्या सभा, दौरे, चौक सभा, रोड शो, भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. शरद पवार यांनी देखील ताकदीने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. शरद पवार यांचा पुढील 22 दिवसांचा प्रचाराचा कार्यक्रम समोर आला आहे. शरद पवारांचं 18 एप्रिल ते 11 मे पर्यंतचं निवडणूक प्रचाराचं नियोजन समोर आलं आहे.
शरद पवार प्रचारासाठी राज्याचा मॅरेथॉन दौरा करणार आहेत. शरद पवार 22 दिवसांत जवळपास 50 सभा घेणार आहेत. उद्या म्हणजेच 17 एप्रिलाला शरद पवार अहमदनगरला मुक्कामी असणार आहेत. त्यानंतर 18 एप्रिलपासून बारामतीतून त्यांच्या सभांना सुरुवात होणार आहे. ११ मेपर्यंत ते पुणे, नाशिक, जळगाव, वर्धा, रायगड, सोलापूर, सातारा, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, कोल्हापूर हे जिल्हे पिंजून काढणार आहे. दिवसाला तीन ते चार सभा ते घेणार आहेत.
ओमराजे निंबाळकरांच्या रॅलीदरम्यान आ. कैलास पाटलांना उष्माघाताचा त्रास, चक्कर येऊन खाली कोसळले
तब्बल 11 जिल्ह्यात शरद पवारांच्या प्रचारसभा असणार आहेत. मात्र शरद पवारांचा बारामतीकडे विशेष लक्ष असणार असल्याचं त्यांच्या नियोजित दौऱ्यातून दिसून येत आहे. कारण, 50 सभांपैकी तब्बल 8 सभा या बारामती लोकसभा मतदारसंघात असणार आहेत.
याशिवाय माढा मतदारसंघात सहा सभा होणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात 5, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 5, शिरुर लोकसभा मतदारसंघात 4, रावेर मतदारसंघात 3, वर्धा लोकसभा मतदारसंघात 2, बीड लोकसभा मतदारसंघात 2, पुणे लोकसभा मतदारसंघात 2 प्रचारसभा शरद पवार करणार आहेत.
'भाजपने 45 प्लस जागा जिंकल्या तर राजकारण सोडा', आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी
- अमर काळे- वर्धा लोकसभा मतदारसंघ
- भास्कर भगरे- दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
- सुप्रिया सुळे- बारामती लोकसभा मतदारसंघ
- अमोल कोल्हे - शिरुर लोकसभा मतदारसंघ
- निलेश लंके - अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
- बजरंग सोनावणे - बीड लोकसभा मतदारसंघ
- सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे- भिवंडी लोकसभा मतदारसंघ
- शशिकांत शिंदे- सातारा लोकसभा मतदारसंघ
- श्रीराम पाटील - रावेर लोकसभा मतदारसंघ