देशभरात तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान; राज्यात दिग्गजांचं भवितव्य पणाला

राज्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात उद्या निवडणूक होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

लोकसभा निवडणूक आता तिसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. एकूण आठ टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरात मंगळवार (7 मे रोजी) मतदान होत आहे. देशभरातील 12 राज्यांतील 93 मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक 25 मतदारसंघांमध्ये, कर्नाटकात 14 मतदारसंघांमध्ये तर महाराष्ट्रात 11 मतदारसंघांमध्ये मतदान आहे.  

महाराष्ट्रात कुठे मतदार होणार?

अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान होणार आहे.  पवार कुटुंबिय प्रथम निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने आहेत. याशिवाय  राज्यात रायगड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात मतदान होत आहे. अनेक दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यातील प्रमुख लढती

  • बारामती - सुप्रिया सुळे (शरद पवार गट) विरुद्ध सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे (भाजप) विरुद्ध विनायक राऊत (ठाकरे गट)
  • सातारा- उदयनराजे भोसले (भाजप) विरुद्ध शशिकांत शिंदे (शरद पवार गट)
  • रायगड- सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध अनंत गीते (ठाकरे गट)
  • माढा- धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार गट) विरुद्ध रणजीतसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
  • कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना) विरुद्ध शाहू महाराज (काँग्रेस)
  • सांगली- चंद्रहार पाटील (ठाकरे गट) विरुद्ध संजयकका पाटील (भाजप) विरुद्ध विशाल पाटील (अपक्ष)
  • सोलापूर- प्रणिती शिंदे (काँग्रेस) विरुद्ध राम सातपुते (भाजप)
  • धाराशिव- ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) विरुद्ध अर्चना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • लातूर - सुधाकर श्रुगांरे (भाजप) विरुद्ध डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
  • हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध राजू शेट्टी (स्वाभिमानी) विरुद्ध सत्यजित पाटील (ठाकरे गट)

( नक्की वाचा : सातारा लोकसभा निवडणूक : पवारांवरील निष्ठा की राजेंचा मान? चुरशीच्या लढतीकडं राज्याचं लक्ष )

तिसऱ्या टप्प्यात भाजपचे 82 तर काँग्रेसचे 68 उमेदवार

उद्या होणाऱ्या 93 जागांपैकी 81 जागांवर भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर 12 जागांवर मित्रपक्षांचे उमेदवार आहेत. तर इंडिया आघाडीकडून काँग्रेस 68 उमेदवार आहेत. तर ठाकरे गट 5, राजद 3, शरद पवार गट 3 आणि आम आदमी पक्ष 2 जागांवर आहे. देशात अमित शाह, दिग्विजय सिंह, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य ईव्हीएमध्ये कैद होणार आहे. 

( नक्की वाचा : रायगड कोण सर करणार? गिते-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई )

कोणत्या राज्यात किती जागांवर मतदान? 

  • महाराष्ट्र- 11 जागा
  • गुजरात  - 25 जागा
  • कर्नाटक - 14 जागा
  • उत्तर प्रदेश - 10 जागा
  • मध्य प्रदेश - 8 जागा
  • छत्तीसगड - 7 जागा
  • बिहार - 5 जागा
  • आसाम,पश्चिम बंगाल- प्रत्येकी 4 जागा
  • गोवा, दादरा नगर हवेली आणि दिव दमण - प्रत्येकी 2 जागा 
  • जम्मू काश्मीर - 1 जागा