"...तर मी देखील तुमच्या मदतीला धावून येईन"; भरसभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींना शब्द

भाजपला संविधान बदण्यासाठी 400 जागा हव्या आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

जाहिरात
Read Time: 2 mins
धाराशिव:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या 'अब की बार 400 पार' घोषणेवर उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. भाजपला संविधान बदण्यासाठी 400 जागा हव्या आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महाविकास आघाडीचे धाराशिवमधील उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होते. उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. त्यांची शस्त्रक्रिया झाली होती त्यावेळी मी त्यांची विचारपूस केली होती, असं मोदींनी म्हटलं. मात्र तुम्ही चौकशी करत होतात, त्यावेळी तुमच्या खालच्या लोकांना हे माहिती नव्हतं का? त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस रात्रीच्या वेळी भेटीगाठी कसे करत होते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. 

नक्की वाचा -' 7 तारखेनंतर हे लोकं घरी आले तर मिशी कापून देईन,' अजित पवारांनी दिलं बारामतीमध्ये चॅलेंज

माझी शस्त्रक्रिया झाली असताना आमचं सरकार खाली खेचण्याचा प्रयत्न तुमचे लोक करत होते. आज तुम्ही बोलत आहात की उद्धव ठाकरेंवर काही संकट आलं तर मी धावून जाईल. मी देखील सांगतो की तुमच्यावर कधी संकट आलं तर मीही धावून येईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

( नक्की वाचा : .... तर 20 वर्ष सरकार बदललं नसतं, ' Exclusive मुलाखतीमध्ये शरद पवारांचा दावा )

शेतीसाठीच्या वस्तूंवरील जीएसटी माफ करेन

आपण नुसतं रडगाणं नाही गात नाही बसायचं. कांद्याची निर्यात बंदी कधी उठणार? असं विचारत बसू नका. आधी ते केंद्रातलं सरकार उठवा. कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठवून दाखवतो. शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव कधी मिळणार, शेतीची बियाणे, खते, अवजारे यांच्यावरील जीएसटी कधी उठणार? असं विचारत बसणार का? मी तुम्हाला वचन देतो शेतीची अवजारे, बियाणे यांच्यावरील जीएसटी पूर्ण माफ करेल, अशा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला. 

Advertisement

उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण

Topics mentioned in this article