आज देशभरात पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू झालं आहे. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा असून 13 मतदारसंघात मतदान सुरू आहे. दरम्यान उकाडा असतानाही नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी प्रशासनापासून ते निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन केलं जात आहे.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी दुकानदार देखील सरसावले असून डोंबिवलीतील रजनीगंधा या दुकानात 4 ते 19 मे खरेदी करा आणि 20 तारखेला मतदान झाल्यानंतर शाई दाखवून पाच टक्के कॅश परत घेऊन जा अशा पद्धतीची ऑफर लावण्यात आली आहे.
नक्की वाचा - LIVE UPDATE: देशात पाचव्या टप्प्याचं मतदान; आज महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार!
डोंबिवलीतील रजनीगंधा हे चादर आणि घरगुती वापरातील वस्तू विक्रीचे दुकान आहे. या आधी देखील दुकानाचे मालक असणारे विपुल वैद्य यांनी अशाच पद्धतीने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केलेले पाहायला मिळाले होते आणि लोकसभेच्या निवडणुकीत देखील मतदानासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडावे यासाठी यावर्षी देखील त्यांनी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करत मतदान करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या अनोख्या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world