संकेत कुलकर्णी, माढा
राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचही टप्पे पूर्ण झाले आहे. सर्व उमेदवारांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र निकाल लागण्याआधीध दावे-प्रतिदावे सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांचे विजयाचे बॅनर्स देखील झककले आहे. तर कोण जिंकणार यावर पैजा देखील लावल्या जात आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माढा लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला आहे. याच मतदारसंघात आता विजयाचे दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. एका बुलेटराजाच्या पैजेच्या आव्हानाने माढा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे.
(नक्की वाचा- ठाकरे कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करा, भाजप आमदाराची मागणी)
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील की भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यापैकी कोण विजयी होणार? याबाबतच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. आता माढा तालुक्यातील बावी येथे असणारे निलेश पाटील आणि माऊली सावंत यांनी चक्क नव्या कोऱ्या 11 बुलेट्सची पैज लावली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी ही पैज लावण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. विशेष म्हणजे ही पैज सध्या एकाही भाजप कार्यकर्त्याने स्वीकारलेली नाही.
(नक्की वाचा- मतदान केंद्रांवर जाणूनबुजून दिरंगाई केली जात आहे, उद्वव ठाकरेंचा आरोप; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार)
एकीकडे बुलेटची पैज असताना, दुसरीकडे अकलूजच्या सहकार महर्षी कारखान्याचे संचालक विराजसिंह निंबाळकर यांनी थार गाडीची पैज धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी लावली असल्याची माहिती सोशल मीडियात आहे. त्यांच्याही पैजेला अद्याप कुणी प्रतिसाद दिलेला नाही.