राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. प्रचार संपला असला तरी नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप अद्याप सुरु आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना पराभव समोर दिसत आहेत, म्हणून ते आता भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय हे समजते. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आणि संजय राऊत यांचं रडगाणं पाहून पुन्हा मोदी सरकार येणार हे स्पष्ट होत आहे. ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट आधी जप्त करावेत. कारण 4 जूननंतर ते लंडनला पळण्याच्या तयारीत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
(नक्की वाचा- मतदान केंद्रांवर जाणूनबुजून दिरंगाई केली जात आहे, उद्वव ठाकरेंचा आरोप; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार)
महायुती 45 चा आकडा गाठणार
कालच्या मतदानानुसार लोकांनी महायुतीला मनापासून स्वीकारलं आहे, हे दिसून आलं आहे. आमचे उमेदवार घासून नाही तर ठासून येतात. देशात 4 जूननंतर सगळे विरोधक हद्दपार दिसतील. 4 जूनला गुलाल आमचाच असेल. महायुती 45 चा आकडा गाठतेय, असा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विझवून टाकली
साधी सरपंचपदाची निवडणूक न लढवलेला माणूस निवडणुकीवर बोलतो. आयुष्यात एक निवडणूक लढवली नाही ते मतदानाची पद्धत शिकवत असतील तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. गल्लीतल्या लोकांना मतदानाचं काही माहीत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विझवून टाकली आहे, अशी टीका देखील नितेश राणे यांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world