'बाजार गुंडांना थारा देणार नाही', भाजपा आमदाराच्या भावाचे रवी राणांच्या विरोधात बंड

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारासंघातील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला अपयश आलं. या मतदारसंघातून रवी राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारासंघातील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला अपयश आलं. या मतदारसंघात भाजपाच्या पााठिंब्यावर युवा स्वाभिमान पार्टी रवी राणा निवडणूक लढवत आहेत. रवी राणांच्या विरोधात भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांनी  बंडखोरी करत अर्ज भरला आहे. यावेळी तुषार भारतीय यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे हातात घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'गेल्या चाळीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे. त्यामुळे मी या मतदारसंघात उमेदवारी मागितली होती. मात्र कुणी बाजारगुंडा,उपरा,संधी साधू या ठिकाणी येऊन पाठिंबा मागत असेल तर आम्हाला आमचा पक्ष वाचवण्यासाठी ही आमची लढाई आहे. गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघांमध्ये सावकारीराज सुरू आहे. हे आमचं बंड नसून ही असली भाजप आहे. त्याची ही लढाई आहे, अशी प्रतिक्रिया तुषार भारतीय यांनी दिली.

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा मतदार हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांना हे गुंडाराज, सावकारीराज संपवायचं आहे. लोकसभेमध्ये आम्ही सांगितलं होतं की आम्ही काम करणार नाही. आम्ही पक्ष मोठा केला त्यामुळे बाजार गुंडांना आम्ही थारा देणार नाही अशी प्रतिक्रिया तुषार भारतीय यांनी यावेळी दिली.

( नक्की वाचा : देवेंद्र फडणवीसांचा शेवटच्या क्षणी फोन, अर्ज भरण्यासाठी निघालेल्या पुण्यातील भाजपा उमेदवाराची माघार )

रवी राणा गेल्या 15 वर्षांपासून बडनेराचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी देण्यात आली होती. लोकसभेलाही नवनीत राणा यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. त्या निवडणुकीत राणा यांना पराभव स्विकारावा लागला होता. आता बडनेरा विधानसभा निवडणुकीतही राणा आणि स्थानिक भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. 

Topics mentioned in this article