जाहिरात
Story ProgressBack

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर पावसाचं सावट, 8 मतदारसंघात होणार मतदान

राज्यात उद्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी याठिकाणी मतदान पार पडणार आहे.

Read Time: 2 min
राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर पावसाचं सावट, 8 मतदारसंघात होणार मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी (२६ एप्रिल) राज्यात पार पडत आहे. राज्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यामध्ये विदर्भातील ६ तर मराठवाड्यातील २ मतदारसंघांचा समावेश आहे. 

कोणत्या मतदारसंघात मतदान?

राज्यात उद्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी याठिकाणी मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का घटल्याने चिंता व्यक्त केली जात होती.  

नक्की वाचा - 13 राज्यातील 89 मतदारसंघात होणार मतदान, 'या' दिग्गजांचं भवितव्य पणाला

राज्यातील प्रमुख लढती

  • अमरावती : नवनीत राणा (भाजप) विरुद्ध दिनेश बुब (प्रहार जनशक्ती पक्ष) विरुद्ध बळवंत वानखडे (काँग्रेस) 
  • अकोला : प्रकाश आंबेडकर (वंचित) विरुद्ध अभय पाटील (काँग्रेस) विरुद्ध अनुप धोत्रे (भाजप)
  • बुलढाणा : नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध प्रतापराव जाधव (शिवसेना) विरुद्ध रविकांत तुपकर (अपक्ष)
  • वर्धा : रामदास तडस (भाजप) विरुद्ध अमर काळे (काँग्रेस)
  • यवतमाळ-वाशिम : राजश्री पाटील (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट)
  • हिंगोली : बाबूराव कोहळीकर (शिवसेना) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट)
  • नांदेड : प्रतापराव चिखलीकर (भाजप) विरुद्ध बळवंतराव चव्हाण (काँग्रेस)
  • परभणी : संजय जाधव (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध महादेव जानकर (रासप) विरुद्ध पंजाब डख (वंचित)
  • ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा)

    मतदानावर पावसाचं सावट

    मतदानाच्या दिवशी शुक्रवारी पश्चिम विदर्भात दुपारी मेघ गर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहानिर्देशक एम एल साहू यांनी एनडीटीव्ही मराठीला याबाबत माहिती दिली. मतदारांनी दुपारपर्यंत मतदान करुन घेण्याचा प्रयत्न करावा. कारण दुपारी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. 

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
    Our Offerings: NDTV
    • मध्य प्रदेश
    • राजस्थान
    • इंडिया
    • मराठी
    • 24X7
    Choose Your Destination