लोकसभेत मुस्लिमांची मतं घेतली, विधानसभेत विसरली! माजी मंत्र्यांचा काँग्रेसवर मोठा आरोप

काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मतं घेतली. पण, विधानसभा निवडणुकीत पक्षाला मुस्लिमांचा विसर पडला आहे, असा आरोप माजी मंत्र्यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक चित्र
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मतं घेतली. पण, विधानसभा निवडणुकीत पक्षाला मुस्लिमांचा विसर पडला आहे, असा आरोप माजी मंत्री अनिस अहमद यांनी केला आहे. विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले अनीस अहमद यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.

सोशल इंजिनिअरिंगमध्ये काँग्रेस अपयशी ठरले आहे. एकाच समाजीत उमेदवारांना काँग्रेसनं उमेदवारी दिली. हे काँग्रेस कोअर कमिटीच्या नेत्याचं अपयश आहे. मुस्लिम, हलबा, तेली, हिंदी भाषिक नेत्यांना काँग्रेस विसरली. मुस्लिम समाजाला विदर्भात एकच तिकीट का? असा प्रश्न त्यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रियेत विचारला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अहमद यांनी काँग्रेस का सोडली?

अनिस अहमद यांनी यापूर्वी सलग तीन वेळा मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ते यंदाही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आग्रही होते. पण, काँग्रेस पक्षानं मागील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बंटी शेळके यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज होत अहमद यांनी पक्षाचा राजीनामा दिला. 

मुस्लीम समुदायातील 99 टक्के मतं काँग्रेसला मिळतात. पण, त्यानंतरही पक्षाकडून त्यांच्याकडं दुर्लक्ष होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसनं एकाही मुस्लीम उमेदवार दिला नव्हता. विधान परिषदेच्या निवडणुकीतही तीच परिस्थिती होती, असा आरोप त्यांनी केला आहे. 

Advertisement

अहमद यांच्या बंडखोरीचा महाविकास आघाडीला नागपूर मध्य, नागपूर उत्तर, नागपूर दक्षिण आणि कामठी या मतदारसंघात फटका बसू शकतो. या सर्व मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे.

( नक्की वाचा : 'या वयात इतके खोटे बोलायचे नसते', देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना खरमरीत उत्तर )

नसीम खान यांनीही केला होता आरोप

मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षावर हाच आरोप केला होता. नसीम खान यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून ही नाराजी व्यक्त केली होती.  'काँग्रेसला मुस्लिमांची मतं हवी आहेत. मुस्लीम उमेदवार का नको?' असं सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मला विचारत आहेत. 'मी याच कारणांमुळे मुसलमानांना सामोरं जाऊ शकत नाही. माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाही,' असं त्यांनी या पत्रात म्हंटलं होतं. नसीम खान यांना यंदा मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. 

Advertisement