Devendra Fadnavis vs Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग घेतला आहे. या प्रचारात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन दिग्गज नेते एकमेकांच्यासमोर आले आहेत. शरद पवार यांनी आज (मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024) बारामतीमध्ये बोलताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केला होता. त्या आरोपांना फडणवीस यांनी 'या वयात इतके खोटे बोलायचे नसते', असं म्हणत खरमरीत उत्तर दिलं आहे.
दिवगंत उद्योगपती रतन टाटा महाराष्ट्रात उद्योग आणणार होते. पण भाजप आणि राज्य सरकारने हे उद्योग गुजरातमध्ये नेले, असा आरोप शरद पवारांनी बारामतीमध्ये केला होता. त्यांच्या या आरोपांना फडणवीस यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट करत उत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी या ट्विटमध्ये पवारांचा आरोप खोडून काढताना निरनिराळे संदर्भ दिले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले फडणवीस ?
या वयात इतके खोटे बोलायचे नसते... काल जयराम रमेशजी आणि आज शरद पवारजी, ज्यांच्या काळात गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर 1 वर होते, ते आज महाराष्ट्र क्रमांक 1 वर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत. तरी सुद्धा खोटा नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगावे लागेल, असं सांगत फडणवीस यांनी टाटा एअरबस, फॉक्सकॉन प्रकल्पाच्या संदर्भात उदाहरणं दिली आहेत.
' टाटा एअरबस, फॉक्सकॉन असो, किंवा अन्य प्रकल्प सातत्याने खोटे बोलून मविआच्या नेत्यांनी दिशाभूल केली. सॅफ्रॅनच्या बाबतीत तर कहरच केला होता. कंपनीने 2 मार्च 2021 लाच हैदराबादेत त्यांच्या प्रकल्पाचे उदघाटन केले होते. पण, आमचे सरकार आल्यावर तोही प्रकल्प गुजरातला गेल्याची आरोळी उठवली गेली. 31 ऑक्टोबर2022 रोजी या सर्वांबाबत मी स्वत: मंत्रालयात एक पत्रपरिषद घेतली होती.
या वयात इतके खोटे बोलायचे नसते...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 29, 2024
काल जयराम रमेशजी आणि आज शरद पवारजी,
ज्यांच्या काळात गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर 1 वर होते, ते आज महाराष्ट्र क्रमांक 1 वर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत.
तरी सुद्धा खोटा नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा… pic.twitter.com/1vgOGSR6X0
सर्व मुद्यांचे सविस्तर सादरीकरण केले होते. पण, पुन्हा पुन्हा खोटे बोलून तोच तो अजेंडा सांगितला जात आहे. स्वत:जवळ काही सांगण्यासारखे नसले तर खोट्याशिवाय कशाचाच सहारा नसतो, हेच सत्य आहे.
( नक्की वाचा : Exclusive : एकनाथ शिंदेच्या बंडाची ठिणगी कधी पडली? फडणवीसांनी सांगितली 'त्या' रात्रीची गोष्ट )
असू द्या. एकिकडे 52 टक्के परकीय गुंतवणूक राज्यात आणणारे सरकार आहे आणि दुसरीकडे गुजरातच्या ब्रँड अॅम्बॅसिडरच्या भूमिकेतील कर्तव्यशून्य महाविकास आघाडी. राज्यातील जनताच याचा निकाल 20 नोव्हेंबरला लावेल,' असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world