उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार ठरले ! आदित्य ठाकरेंसह 65 जणांची नावं जाहीर, पाहा संपूर्ण यादी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 65 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आत्तापर्यंत भाजपा, मनसे, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या प्रमुख पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत. प्रकास आंबेडकर यांच्या वंचित बहुजन अघाडीनंही उमेदवारांची घोषणा केली आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये मात्र जागावाटपाची चर्चा सुरु होती. ही चर्चा अंतिम टप्प्यात येताच  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 

आदित्य ठाकरे वरळीतून लढणार

उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा वरळीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. आदित्य यांनी 2019 साली या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती.  भास्कर जाधव यांना गुहागर तर वैभव नाईक यांना कुडाळमधून उमेदवारी देण्यात आलीय. शिवसेना ठाकरे पक्षासाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे शहर मतदारसंघातून राजन विचारे यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यांना पक्षानं AB फॉर्म दिला आहे.

( नक्की वाचा :  अजित पवारांच्या मनात काय? पहिल्या यादीनंतर नवाब मलिकसह दिग्गज नेते वेटिंगवर )


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार

    1. चाळीसगाव-उन्मेश पाटील
    2. पाचोरा-वैशाली सुर्यवंशी
    3. मेहकर (अजा)-सिध्दार्थ खरात
    4. बाळापूर-नितीन देशमुख
    5. अकोला पूर्व-गोपाल दातकर
    6. वाशिम (अजा)-डॉ. सिध्दार्थ देवळे
    7. बडनेरा- सुनील खराटे
    8. रामटेक-विशाल बरबटे
    9. वणी-संजय देरकर
    10. लोहा-एकनाथ पवार
    11. कळमनुरी-डॉ. संतोष टारफे
    12. परभणी-डॉ. राहुल पाटील
    13. गंगाखेड-विशाल कदम
    14. सिल्लोड-सुरेश बनकर
    15. कन्नड-उदयसिंह राजपुत
    16. संभाजीनगर मध्य-किशनचंद तनवाणी
    17. संभाजीनगर प. (अजा)- राजु शिंदे
    18. वैजापूर-दिनेश परदेशी
    19. नांदगांव-गणेश धात्रक
    20. मालेगांव बाह्य-अद्वय हिरे
    21. निफाड-अनिल कदम
    22. नाशिक मध्य-वसंत गीते
    23. नाशिक पश्चिम-सुधाकर बडगुजर
    24. पालघर (अज)-जयेंद्र दुबळा
    25. बोईसर (अज)-डॉ. विश्वास वळवी
    26. [7:05 pm, 23/10/2024] Shreerang Khare: भिवंडी ग्रामीण (अज)-महादेव घाटळ
    27. अंबरनाथ (अजा) -राजेश वानखेडे
    28. डोंबिवली-दिपेश म्हात्रे
    29. कल्याण ग्रामिण-सुभाष भोईर
    30. ओवळा माजिवडा-नरेश मणेरा
    31. कोपरी पाचपाखाडी-केदार दिघे
    32. ठाणे-राजन विचारे
    33. ऐरोली-एम. के. मढवी
    34. मागाठाणे-उदेश पाटेकर
    35. विक्रोळी-सुनील राऊत
    36. भांडुप पश्चिम-रमेश कोरगावकर
    37. जोगेश्वरी पूर्व-अनंत (बाळा) नर
    38. दिंडोशी-सुनील प्रभू
    39. गोरेगांव-समीर देसाई
    40. अंधेरी पूर्व-ऋतुजा लटके
    41. चेंबूर-प्रकाश फातर्पेकर
    42. कुर्ला (अजा)-प्रविणा मोरजकर
    43. कलीना-संजय पोतनीस
    44. वांद्रे पूर्व-वरुण सरदेसाई
    45. माहिम-महेश सावंत
    46. वरळी-आदित्य ठाकरे
    47. कर्जत-नितीन सावंत
    48. उरण-मनोहर भोईर
    49. महाड-स्नेहल जगताप
    50. नेवासा-शंकरराव गडाख
    51. गेवराई-बदामराव पंडीत
    52. धाराशिव- कैलास पाटील
    53. परांडा-राहुल ज्ञानेश्वर पाटील
    54. बार्शी-दिलीप सोपल
    55. सोलापूर दक्षिण-अमर रतिकांत पाटील
    56. सांगोले-दिपक आबा साळुंखे
    57. पाटण-हर्षद कदम
    58. दापोली-संजय कदम
    59. गुहागर-भास्कर जाधव
    60. रत्नागिरी-सुरेंद्रनाथ (बाळ) माने
    61. राजापूर-राजन साळवी
    62. कुडाळ-वैभव नाईक
    63. सावंतवाडी-राजन तेली
    64. राधानगरी-के.पी. पाटील
    65. शाहूवाडी-सत्यजीत आबा पाटील