महाविकास आघाडीच्या चर्चेच्या चक्रात ठाकरे गटाची यादी आली, 12 ठिकाणी उमेदवार ठरले

महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप अधिकृत जाहीर झालेला नाही. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे 12 उमेदवार निश्चित केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाविकास आघाडी पक्षाचं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये सध्या जागावाटपावर चर्चा सुरु आहे. हा तिढा सुटत असल्याचा दावा तीन्ही पक्ष करत आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 288 पैकी 105 जागांवर काँग्रेस, 95 जागांवर शिवसेना ठाकरे आणि 84 जागांवर शरद पवारांचा पक्ष लढणार आहे. मुंबईमधील निम्म्या जागा ठाकरेंचा पक्ष लढणार आहे. महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप अधिकृत जाहीर झालेला नाही. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे 12 उमेदवार निश्चित केले आहेत. या उमेदवारांना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी AB फॉर्मचं वाटपही करण्यात आलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुणाला मिळाली उमेदवारी?

नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि मालेगाव बाह्य या मतदारसंघातून ठाकरे यांच्या पक्षानं उमेदवारी जाहीर केलीय. सुधाकर बडगुजर (नाशिक पश्चिम), वसंत गिते (नाशिक मध्य) यांना पक्षानं उमेदवारी दिलीय. तर मालेगाव बाह्यमधून शिवसेना नेते दादा भुसे यांच्याविरोधात अद्वय हिरे यांना उमेदवारी देण्यात आलीय.

भुजबळांची आशा मावळली

नांदगाव मतदारसंघातून माजी खासदार आणि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार ही चर्चा होती. पण, ठाकरे यांनी नांदगावमधून गणेश धात्रक यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्ष आग्रही असूनही ठाकरे यांच्या पक्षानं दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिलीय. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. 

( नक्की वाचा : अजित पवारांच्या मनात काय? पहिल्या यादीनंतर नवाब मलिकसह दिग्गज नेते वेटिंगवर )

शिवसेना ठाकरे गटाकडून कुणाला मिळाले AB फॉर्म?

सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)
वसंत गिते(नाशिक मध्य) 
अद्वय हिरे (मालेगाव बाह्य) 
एकनाथ पवार (लोहा कंधार)
के पी पाटील, राधानगरी विधानसभा
बाळ माने, रत्नागिरी विधानसभा
उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा
अमर पाटील, सोलापूर दक्षिण
गणेश धात्रक, नांदगाव
दीपक आबा साळुंखे पाटील,  सांगोला
प्रविणा मोराजकर, कुर्ला विधानसभा 
एम के मढवी, ऐरोली विधानसभा