नरेश म्हस्केंची ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शाखेत अचानक एन्ट्री, पुढे काय झालं? VIDEO

ठाण्यातील चंदनवाडी शाखेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने ही शाखा म्हणजे सर्व शिवसैनिकांचे  श्रद्धास्थान मानली जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins
ठाणे:

लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहे. अनेक जागांवर दोन्ही गटाच्या नेत्यांची थेट लढत होत आहे. ठाण्यातील जागेवरही शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार राजन विचारे मैदानात आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच आज नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

झालं असं की, महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के प्रचारादरम्यान ठाण्यातील चंदनवाडी आले होते. तिथे असेलल्या शिवसेना शाखेत नरेश म्हस्के दाखल झाले होते. शाखेत जात नरेश म्हस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घातला आणि नतमस्तक झाले.   

(नक्की वाचा- सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांनी उधळला विजयाचा गुलाल, निवडणुकीच्या निकालाआधीच सेलिब्रेशन)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांच्या हाती ही शाखा आहे.  या शाखेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने ही शाखा म्हणजे सर्व शिवसैनिकांचे  श्रद्धास्थान मानली जाते. ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी असलेल्या शाखा कोणाच्या या मुद्द्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाल्याचं अनेकदा पाहायला मिळालं होतं. मात्र ही शाखा या सर्वाला अपवाद ठरली. 

( नक्की वाचा - मतदान केलं अन् मिळाली हिऱ्याची अंगठी, नेमकं काय घडलं?)

मात्र सध्या चंदनवाडी येथील ही शाखा ठाकरे गटाकडे आहे. शिवसेनेच्या ताब्यात असली तरी नरेश म्हस्के यांनी या शाखेत प्रवेश करून ठाकरेंच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठाकरे गटाकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article