जाहिरात
This Article is From May 08, 2024

मतदान केलं अन् मिळाली हिऱ्याची अंगठी, नेमकं काय घडलं?

कशी मिळाली हिऱ्याची अंगठी?

मतदान केलं अन् मिळाली हिऱ्याची अंगठी, नेमकं काय घडलं?
भोपाळ:

भोपाळच्या अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडावं यासाठी लॉटरीची स्किम ठेवण्यात आली होती. या लॉटरीच्या योजनेत योगेश साहू या तरुणाने सकाळी 11 वाजता झालेल्या लकी ड्रॉमध्ये हिऱ्याची अंगठी जिंकली आहे. यानंतर दुपारी दोन वाजता आणि सायंकाळी 5 वाजतादेखील दोन अन्य ड्रॉ ठेवण्यात आले होते. आणि यानंतर 9 मे रोजी भोपाळमध्ये एक बंपर ड्रॉ देखील ठेवण्यात आला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतटक्का घसरला होता. त्यामुळे मतदारांनी घराबाहेर पडावं यासाठी वारंवार आवाहन केलं जात होतं. दरम्यान भोपाळमधील पोलिंग बुथवर लॉटरी स्किमचं आयोजन करण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मोहिमेदरम्यान भोपाळमधील अनेक भागात लकी ड्रॉची घोषणा करण्यात आली होती आणि जे मतदानाचा हक्क बजावतील अशांना आकर्षक बक्षीसं दिली जातील. 

नक्की वाचा - राज्यात मतदानाचा टक्का का घसरला? विचार करायला लावणारी 5 कारणे

या योजनेअंतर्गत मतदारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भोपाळचा इतिहास पाहिला तर येथे नेहमीत कमी मतटक्का राहिला आहे. 2019 मध्ये अनेक मतदारसंघातील टक्का वाढला होता, तेव्हाही भोपाळमध्ये मतदारांच्या संख्येत काही अंशाने  वाढ पाहायला मिळाली होती, जी 65.7% टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. या लकी ड्रॉमध्ये तीन मतदारांना हिऱ्याची अंगठी मिळाली होती. तर एकाला मिक्सर आणि वॉटर कुलर मिळालं. तर काहींना केवळ टी-शर्टवर समानाध मानालं लागलं होतं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com