... तर शटर बंद करीन! राज यांनी पुन्हा आळवला मशिदीवरच्या भोंग्यांचा राग

रस्त्यावरची नमाज बंद करून टाकणार असे राज यांनी जाहीर केले. दोन दिवसात मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतल्या आपल्या पहिल्याच सभेत सत्ता आल्यावर आपण पहीलं काम काय करू हेच सांगून टाकलं आहे. सत्ता आल्यास मशिदीवर एकही भोंगा ठेवणार नाही. त्याच बरोबर रस्त्यावरची नमाज बंद करून टाकणार असे राज यांनी जाहीर केले. दोन दिवसात मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. या जाहीरनाम्यात ही बाब असेल असेही त्यांनी सांगितले. घाटकोपर इथं घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. एक संधी या राज ठाकरेला देवून बघा. नालायक ठरलो तर दुकान बंद करने असे ही त्यांनी मतदारांना सांगितले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मशिदीवरच्या भोंग्यांचा सर्वानाच त्रास होत होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. भोंगे खाली उतरवा नाहीतर मशिदी समोर हनुमान चालीसा बोलणार असा इशारा दिला होता. त्यावेळी 17 हजार मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यावेळच्या सरकारने जर साथ दिली असती तर आज मशिदीवर भोंगे दिसले नसते असे राज ठाकरे म्हणाले. मात्र जस सत्ता आली तर सर्वात पहीले जर कोणते काम करेन तर ते मशिदीवरचे भोगे खाली उतरवणार. शिवाय रस्त्यावर जे नमाज पठण केले जाते ते बंद करणार असल्याचेही सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - कुटुंब एक पण पक्ष अनेक! राजकारणात दबदबा असलेले 'हे' कुटुंब माहीत आहे का?

एका धर्माचा दुसऱ्या धर्माला त्रास होता कामा नये. धर्म घरात ठेवावा. तो तुमच्या उंबरठ्याच्या आत ठेवावा. सणाला समजू शकतो. पण वर्षाच्या 365 दिवस भोंगे लावणार असाल तर ते चालणार नाही, असेही राज यांनी खडसावले. काही जण हिंदूत्व हिंदूत्व करतात. पण त्यांचे हिंदूत्व फक्त प्रचार सभा मध्ये दिसते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. पुढच्या दोन तीन दिवसात मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल असे त्यांनी सांगितले. त्यात हा मुद्दा असणार आहे. बाकीचे मुद्देही तुम्हाला लवकर समजतील असं त्यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - माजी खासदार बाळू धानोरकरांच्या मृत्यूबाबत आईचाच मोठा गौप्यस्फोट, अखेर मौन सोडलं

आतापर्यंत तुम्ही अनेकांना संधी देवून पाहीली. आता एकदा राज ठाकरेला संधी द्या. या राज ठाकरेच्या हातात एकदा सत्ता द्या. नालायक ठरलो तर परत तुमच्या समोर येणार नाही. मनसेचं दुकान बंद करून टाकीन असे त्यांनी मतदारांना सांगितले. पाच वर्षात तुम्हाला एकदाच संधी मिळते. त्या संधीचं सोनं करा. जर एकदा संधी हुकली तर पुढची पाच वर्ष वाट पहावी लागते. गेल्या पाच वर्षात तुमच्या मताची प्रतारणा झाली आहे. त्यामुळे त्याचा बदला घेण्याची आत वेळ आली आहे. त्यामुळे मनसेच्या उमेदवाराला मतदान करून विजयी करा असे आवाहन राज यांनी केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'मविआचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे...' फडणवीस थेट बोलले

सत्ता नसताना मनसेने अनेक कामं मार्गी लावली. त्यात टोलचे आंदोलन मोठे होते. त्या आंदोलना मुळेच मुंबईतले सर्व टोल हे रद्द झाले. पण त्याचे श्रेय कधी मनसेने घेतले नाही. त्याच बरोबर मराठी पाट्यांचे आंदोलनही मनसेने केले होते. मोबाईलवरील सुचना पहिले हिंदी आणि इंग्रजीत बोलले जायचे. पण मोबाईल कंपन्यांना दणका दिल्यानंतर आता मोबाईलवरही मराठी बोलले जाते. या शिवाय रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना संधी मिळवून देण्याचे कमही मनसेच्या रेल्वे आंदोलनामुळेच मिळाली असेही राज यांनी यावेळी सांगितले.