जाहिरात
Story ProgressBack

कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेची माघार, कारण काय?

महायुतीत असूनही कोणत्याही चर्चे शिवाय मनसेने उमेदवार जाहीर केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. लोकसभेला राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता.

Read Time: 2 mins
कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेची माघार, कारण काय?
मुंबई:

कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेने माघार घेतली आहे. मनसेने या मतदार संघातून अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. महायुतीत असूनही कोणत्याही चर्चे शिवाय मनसेने उमेदवार जाहीर केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. लोकसभेला राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानंतर लगेचच जाहीर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत मात्र त्यांनी भाजप विरोधात आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. मात्र त्यांनी तिथूनही माघार घेतली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपचे निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदार संघातून प्रतिनिधीत्व करतात. त्यांची मुदत आता संपत आहे. त्यामुळे या मतदार संघातून त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल. महायुतीचे तेच उमेदवार असतील अशी चर्चा होती. त्याच वेळी मनसेने अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधरसाठी मैदानात उतरवले. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली होती. मनसेने उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. आता निरंजन डावखरे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. देवेंद्र फडणवीसांनी विनंती केली म्हणून आपण उमेदवारी माघार घेत असल्याचे यावेळी नितीन सरदेसाई यांनी माध्यमांना सांगितले.    

हेही वाचा -  हिशेब चुकता! 5 वर्षानंतर डोक्यावरची टोपी काढणार, सत्तार-दानवे वाद पेटणार?

विधान परिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या चारही जागांची मुदत 7 जुलै 2024 ला संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 मे आहे तर, मतदानाची तारीख 10 जून आहे. 13 जूनला मतमोजणी होईल. कोकण पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रमेश किर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून निरंजन डावखरे हे मैदानात असतील.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
कशी असेल पीएम मोदींची नवी टीम, कोण कोण होणार मंत्री? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेची माघार, कारण काय?
Who has a chance in Modi's cabinet from Maharashtra? 'These' names are in discussion
Next Article
महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? 'ही' नावे आहेत चर्चेत
;