विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता तापायला लागले आहे. त्यात आता महाविकास आघाडीने भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्या मतदार संघात लोकसभेला महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले तिथल्या मतदार याद्यांमधील नावे वगळण्याचा धडाका लावला जात आहेत. प्रत्येक मतदार संघातून दोन हजार ते दहा हजार मतदारांची नावं ही वगळली जात आहेत. ही सर्व नावे आघाडीचे मतदार असल्याचेही समोर आले आहे. त्याचे पुरावेच महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आले. या मागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करणार असल्याचेही मविआच्या नेत्यांनी सांगितले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्रात भाजप विधानसभा निवडणूक हरणार आहे. याची त्यांना चांगलीच कल्पना आली आहे. त्यामुळे भाजपकडून सध्या रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. सरकार आणि साधनांचा चुकीचा वापर सध्या केला जात असल्याचेही ते म्हणाले. निवडणूक आयोगाचे अधिकारीही सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. राज्यात भाजप हरणार आहे. हे भाजपसह त्यांच्या मित्र पक्षांनाही माहिती आहे. त्यामुळे सध्या रडीचा डाव खेळला जात आहे. जर दम असेल तर आमने- सामने लढा असे आव्हान पटोले यांनी भाजप आणि शिंदेंना दिले आहे. रडीचा डाव करून जिंकण्याचा प्रयत्न महायुती करत आहे असा आरोपही त्यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता
हे आरोप करत असताना मविआच्या नेत्यांनी पुरावेही सादर केले. किरण गाडेकर या चिखली तालुक्यातील तेलाना गावच्या सरपंच आहेत. त्यांचे नाव मतदार यादीतून वगळावे यासाठी सातनंबरचा फॉर्म भरून अर्ज करण्यात आला होता. ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांच्या एकट्याचेच नाव वगळण्यासाठी अर्ज नव्हता. तर गावातील जवळपास 60 लोकांची नावे वगळण्यासाठी अर्ज आले होते असा आरोप किरण गाडेकर यांनी केला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात संतोष शशिकांत पवार हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याच्या निवडणूक कार्डावर फोटो वेगळा आणि नाव वेगळे अशी स्थिती आहे हे ही निदर्शनास आणून दिले आहे. यावरू मविआ आक्रमक झाली असून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान गेल्या दहा दिवसात चिखली मतदार संघात जवळपास 2 हजार 600 अर्ज हे नाव रद्द करण्यासाठी आले आहेत हे ही समोर आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - नवनीत राणांनंतर रवी राणांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध, पुन्हा खेला होणार?
दरम्यान सरकारच्या माध्यमातून सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी योजना दुत नेमले गेले आहेत. त्यांना 50 हजार देण्यात आले आहेत. हे सर्व आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. यातून सरकारच्या पैशाची उधळपट्टी होत आहे असा आरोपही या पत्रकार परिषदेत करण्यात आला. योजना दुत ही बोगस लोक आहेत ते बंद करावे अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे नाव कमी करण्यासाठी खोटे अर्ज केले जात आहे त्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी ही यानिमित्ताने करण्यात आली आहे. शिवाय जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यातही पारदर्शकता असली पाहीजे अशी मागणी करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - दाऊदबरोबर संबंध असल्याचा आरोप,नंतर जेलवारी, आता लेकीसह बापालाही उमेदवारी
तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मतदार यादीतून नाव रद्द करण्यासाठी जी ऑनलाईन प्रक्रीया राबवली जात आहे तीच मुळात चुकीची असल्याचे सांगितले आहे. शिवाय ज्या मतदार याद्या छापण्यात आल्या आहेत, त्यात अनेकांची नावे आणि फोटोही व्यवस्थित दिसत नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदार संघातून पाच हजार नावं बाहेर काढण्याचा डाव आखला गेल्याचे ते म्हणाले. काही ठिका जिवंत माणसं मृत्यू दाखवले आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले. जिथे लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अधिकची मते आहे तिथे हा प्रयोग सुरू झाला आहे. असा आरोपही करण्यात आला आहे.