जाहिरात
Story ProgressBack

विकासाच्या मुद्द्यावरुन गडकरींना मत की 'विकास' यांना संधी; नागपुरकरांचा कल कोणाच्या बाजूने?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या नागपुरात यंदा कोण बाजी मारणार?

Read Time: 4 mins
विकासाच्या मुद्द्यावरुन गडकरींना मत की 'विकास' यांना संधी; नागपुरकरांचा कल कोणाच्या बाजूने?
नागपूर:

नागपूर लोकसभा मतदारसंघ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या नागपुरात यंदा कोण बाजी मारणार याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. 
लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत नागपुर लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीतून विकास ठाकरे यांच्यात लढत आहे. नागपुरात जातीय समीकरणांवर मतदान होत नाही तर विकासाच्या मुद्द्यांवरुन मतदान केलं जातं असं म्हटलं जातं. मात्र यंदा परिस्थिती वेगळी असल्याकारणाने जातीय मुद्दा महत्त्वाचा ठरणार की, विकासाच्या मुद्द्यावरुन गडकरींना मतदार केलं जाणार याबाबत राजकीय तज्ज्ञांमध्येही मतमतांत्तरे आहेत.

गेल्या निवडणुकांमध्ये काय घडलं?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपुरात 54.32 टक्के मतदान झालं. येथील 22,23,281 मतदारांपैकी 12,07,738 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत नागपुरात 54 टक्के मतदान झालं होतं. गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी 6,60,221 (55.67 %) मतांनी विजयी झाले होते. तर काँग्रेसचे नाना पटोले 4,44,212 (37.45) मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी 2019 मध्ये विजयाचं अंतर 2,16,009 लाखांपर्यंतच होतं. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 19,00,784 मतदारांची नोंदणी होती. त्यावेळीही भाजपमधून नितीन गडकरी 5,87,767 मतांसह विजयी झाले होते. त्यांना त्यावेळी 54.13 टक्के मतदान झालं होतं. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार विलास मुट्टेमवर 3,02,919 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 27.9 टक्के मतदान झालं होतं. 2009 मध्ये मात्र येथील काँग्रेसचे विलासराव बाबुरावजी यांनी 3,15,148 मतांसह विजय मिळवला होता.   

Latest and Breaking News on NDTV

कोणत्या मुद्द्यावरुन नागपूरात मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नागपुरात मतदान पार पडलं. विदर्भातील इतर मतदारसंघापेक्षा नागपुरात मतदानाचा टक्का कमी होता. गेल्या दहा वर्षात गडकरींनी नागपुरात केलेली कामं यामध्ये रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रो, आयआयएम, एम्स यावरुन भाजपकडून मतं मागितली जात होती. मात्र यंदा स्थानिक मुद्द्यांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये शिक्षण, पाणी, आरोग्य यावरही भर देण्यात आला होता. दहा वर्षे विकास ठाकरे नागपूर शहर काँग्रेस अध्यक्षपदी राहिले आहेत. याशिवाय ते महापौरही होते. नागपुरात कुणबी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नागपुरात 50 टक्क्यांहून अधिक टक्के मतदान ओबीसींचं आहे. येथे कुणबी समाजाची साडे चार लाख मतं आहेत. त्यामुळे विकास ठाकरेंना कुणबी, मुस्लीम आणि दलित मतं मिळतील असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. यंदाची निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर लढवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन लाख नवमतदारांची संख्या आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांची मतं खेचून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - राय'गड' तटकरेंचा का की गितेंचा? जनमत कोणाच्या बाजूने?

विकास ठाकरेंची उमेदवारी भाजपसाठी आव्हानात्मक?
नितीन गडकरींनी गेल्या दहा वर्षात नागपूरात रस्ते, ब्रिज या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम झालं आहे. त्यात राष्ट्रीय प्रतिमेचा नितीन गडकरींना फायदा होऊ शकतो. नितीन गडकरी आरोप-प्रत्यारोप करीत नाहीत तर विकासाच्या मुद्द्यावरुन मतं मागतात.  नितीन गडकरींनी सुरुवातीला नागपूरात प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र नागपुरातील स्थानिक नेता विकास ठाकरेंचं आव्हान आल्यानंतर नितीन गडकरींनीही प्रचार सभेचा धडाका उडवला. यावेळी नितीन गडकरींसह त्यांची पत्नी, सून सर्वजण वॉर्डावॉर्डांमधून प्रचार करताना दिसले. यंदा मतदारसंघातील परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरात सभा घेतली. याशिवाय योगी आदित्यनाथांचीही सभा झाली. 2019 च्या निवडणुकीत नितीन गडकरींच्या प्रचारासाठी केवळ अमित शहाचं आले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. मात्र यंदा काँग्रेसचे नागपुरात जातीय समीकरणांच्या आधारावर विकास ठाकरे यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे विकास ठाकरेंसाठी कन्हैया कुमार आणि मल्लिकार्जुन खरगेदेखील प्रचारासाठी नागपुरात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपुरात गेल्या पाच वर्षात अनेक दौरे केले. मात्र तरीही तेथे गडकरींना मोठ्या प्रमाणात प्रचार करावा लागला. अगदी मुस्लीम पॉकेट्स असलेल्या जाफरनगर, नवीनपुरा येथेही भाजपने प्रत्यक्ष संघटन कौशल्यावर भर दिला. 

Latest and Breaking News on NDTV

नागपुरातील विधानसभेची काय आहे परिस्थिती?
नागपुरातील एकूण सहा विधानसभेत चार जागांवर भाजप आणि दोन जागांवर काँग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे या जागेवर भाजपचं वर्चस्व दिसून येतं. भाजपचे कृष्णा खोपडे आमदार असलेले पूर्व नागपूर विधानसभा मततदारसंघात यंदा सर्वात जास्त मतदान पार पडलं.  
विधानसभा मतदारसंघ

क्रमांक        मतदारसंघ     आमदार  2019 (मतदानाची टक्केवारी)    2024 (मतदानाची टक्केवारी)  
1दक्षिण-पश्चिम नागपूर   देवेंद्र फडणवीस   56.8652.94
2दक्षिण नागपूरमोहन मते43.6253.96
3पूर्व नागपूरकृष्णा खोपडे52.3555.77
4मध्य नागपूरविकास कुंभारे46.3754.28
5पश्चिम नागपूरविकास ठाकरे45.6553.73
6उत्तर नागपूरनितीन राऊत42.3555.12

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Hingoli Lok Sabha 2024 : 2 शिवसैनिकांच्या लढतीत हिंगोलीकर परंपरा कायम राखणार?
विकासाच्या मुद्द्यावरुन गडकरींना मत की 'विकास' यांना संधी; नागपुरकरांचा कल कोणाच्या बाजूने?
mallikarjun-kharge-exclusive ndtv-interview-rahul-gandhi-prime-minister-india-alliance-my-choice-for-pm-candidate
Next Article
Exclusive : पंतप्रधानपदाची चॉईस कोण? काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी सांगितली 'मन की बात'
;