![हिना गावित विजयाची हॅटट्रिक मारणार? की काँग्रेस पुन्हा गड काबीज करणार? हिना गावित विजयाची हॅटट्रिक मारणार? की काँग्रेस पुन्हा गड काबीज करणार?](https://c.ndtvimg.com/2024-05/s8s61gtg_nandurbar-lok-sabha-election-2024_625x300_11_May_24.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोर लावला आहे. भाजपच्या डॉ. हिना गावित यांच्याविरुद्ध काँग्रेसचे अॅड. गोवाल पाडवी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नंदुरबारमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत आहे. लोकसभा मतदारसंघात असलेला नंदुरबार लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, प्रियंका गांधी, नाना पटोले यासारख्या दिग्गजांच्या सभा झाल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नंदुरबार मतदारसंघाचा राजकीय इतिहास
महाराष्ट्रातील नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा स्वतःचा वेगळा इतिहास आहे. 2014 पूर्वी नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता आणि याआधी तब्बल 60 वर्ष कोणत्याही पक्षाचा नेता येथे विजयी झाला नव्हता. 2014 मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला ढासळला.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 2014 साली भाजपच्या हिना गावित यांनी माणिकराव गावित यांचा पराभव केला. त्यानंतर 2019 साली देखील हिना गावित यांनी केसी पाडवी यांचा पराभव केला. त्यामुळे हिना गावित विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
(नक्की वाचा- रावेर लोकसभा : एकनाथ खडसेंच्या घरवापसीचा सुनेला फायदा?)
2014 साली डॉ. हिना गावित यांनी 5,79,486 मते मिळवली होती. तर माणिकराव गावित यांनी 4,72,581 मते मिळवली होती. 2019 साली डॉ. हिना गावित यांनी पुन्हा विजयी होत 6,39,136 मते मिळवली. तर ॲड. केसी पाडवी यांनी 5,43,504 मते मिळवली.
यंदाच्या निवडणुकीत उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये लढत होत आहे. हिना गावित या एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर आहेत. तसेच त्यांनी वकिलीचं शिक्षणही घेतलं आहे. गोवाल पाडवी देखील वकील आहे. त्यामुळे शिक्षक विरुद्ध वकील असा सामना येथे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसचे प्रचारातील मुद्दे
घराणेशाही, आरक्षण, संविधान बचाव, बेरोजगारी, स्थलांतर, दुर्गा भागातील प्रश्न.
भाजपचे प्रचारातील मुद्दे
हर घर नल योजना, घरकुल योजना, संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे, उज्वला योजना, कामगार कल्याण योजना इत्यादी.
( नक्की वाचा : जालना लोकसभा : रावसाहेब दानवे विजयाचा षटकार लगावणार का? )
मतदारसंघाचं वैशिष्ट्य
- नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आदिवासी समाजाचे मोठे प्राबल्य.
- आदिवासींची मते याठिकाणी निर्णायक ठरतात.
- काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघ 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपकडे आला.
- भाजपकडून ही जागा राखण्यासाठी नरेंद्र मोदींची सभा घेण्यात आली.
- मोदींच्या सभेनंतर मात्र काँग्रेसनेही प्रियंका गांधींची सभा घेऊन मत खेचून आणण्याचा प्रयत्न.
- नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराचे साधन उपलब्ध होत नसल्यामुळे गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे.
- दुर्गम भागात स्वास्थ समस्या आहेत.
( नक्की वाचा : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या राजधानीवर कुणाचा फडकणार झेंडा? )
विधानसभा मतदारसंघातील ताकद
जिल्ह्यातील सहापैकी दोन आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत. इतर तीन आमदार भाजपचे आहेत आणि एक अपक्ष आमदार आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे केसी पाडवी, नवापूर येथे शिरीषकुमार नाईक हे काँग्रेसचे आमदार आहे. तर शहादा येथे राजेश पाडवी, नंदुरबार येथे विजयकुमार गावित, शिरपूर येथे काशीराम पावरा आणि साक्री येथे मंजुळा गावित या अपक्ष आमदार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world