जाहिरात

मोदींची सभा, रामाचा मुद्दा, सर्वाधिक आमदार-नगरसेवक; वाजेंनी कसा भेदला भाजपचा बालेकिल्ला?

नाशिक लोकसभा मतदारसंघाची विधानसभा निहाय आकडेवारी पाहिल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

मोदींची सभा, रामाचा मुद्दा, सर्वाधिक आमदार-नगरसेवक; वाजेंनी कसा भेदला भाजपचा बालेकिल्ला?
नाशिक:

किशोर बेलसरे, नाशिक

उमेदवारीवरुन सर्वाधिक चर्चा असणाऱ्यांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचं नाव आहे. येथून उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे विजयी झाले आहेत. शिंदे गटाचे विद्यमान खासदार यांची हॅटट्रिक यंदा हुकली आहे. याच्या कारणांचा विचार केला तर विधानसभा निहाय आकडेवारी पाहणं गरजेचं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे तर एक महाविकास आघाडीचा असतानाही महायुतीचे उमेदवार आणि तिसरी टर्म निवडणूक लढवणारे हेमंत गोडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला. सत्ताविरोधी वातावरण आणि स्थानिक आमदारांच्या कामगिरीत आलेली कमतरता या सर्वांचा विचार करता महायुतीला फटका सहन करावा लागला. 

राजाभाऊ वाजे - 6,16,729 (महाविकास)
हेमंत गोडसे - 4,54,728 (महायुती)
करण गायकर - 47,193 (वंचित)
शांतिगिरी महाराज - 44,524 (अपक्ष)

नाशिकची विधानसभा निहाय आकडेवारी...

सिन्नर तालुका
राजाभाऊ वाजे : 1,59,492 
हेमंत गोडसे : 31,254
सिन्नर हा तालुका महायुतीच्या अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा बालेकिल्ला असताना या ठिकाणावरून वाजे यांना 1,28,238 विजयाचा लीड मिळाला आहे.
वास्तविक सिन्नर हा निवडून आलेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा देखील बालेकिल्ला आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांचे विधानसभा सभेत होणारे स्पर्धक राजाभाऊ वाजे यांना खासदार केल्याने त्यांना आता विरोधक राहिलेला नाही आणि  आमदारकीसाठी त्यांना मतदार संघ मोकळा झालेला आहे, अशीही चर्चा सुरू आहे. 

नक्की वाचा - बीडमध्ये महायुतीचे सर्वाधिक आमदार, तरीही पंकजा मुंडे पराभूत; कोणत्या विधानसभेमुळे झाला दगा?

नाशिक पूर्व 
राजाभाऊ वाजे 1,00,311
हेमंत गोडसे 89,911
वाजेंचा लीड: 10,400
नाशिक पूर्वमध्ये भाजपाचे आमदार राहुल ढिकले असताना देखील महाविकास आघाडीला या ठिकाणी लीड घेता आलेलं नाही. वास्तविक पाहता हा मतदार संघ भाजपाचा कट्टर मतदार संघ असताना या ठिकाणी भाजपाचे 21 नगरसेवक असताना देखील राजाभाऊ वाजेंना या ठिकाणी 10,400 हजारांची लीड आहे. मागील पंचवार्षिकमध्ये येथून हेमंत गोडसेंना एक लाख पंधरा हजाराने लीड होता.  त्यामुळे भाजपाचे आमदार राहुल ढिकले यांची देखील कामगिरी फारशी चांगली होऊ शकली नाही. 

नाशिक मध्य
हेमंत गोडसे :84,906
राजा भाऊ वाजे: 88,712
वाजे यांचा लीड:3,806
नाशिकमध्ये भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे दोन वेळा निवडून आल्या आहेत. मात्र या ठिकाणी मुस्लीम दलित लोकसंख्या जास्त असल्याने वाजे यांना तीन हजाराचा लीड मिळाला आहे. परंतु महायुतीच्या भाजपच्या पावरफुल आमदार देवयानी फरांदे असताना देखील हेमंत गोडसेना लीड न मिळणे आश्चर्याचे मानले जात आहे. दुसरे असे की मध्य मध्ये मुस्लीम, दलित लोकसंख्या जरी असली तरी गंगापूर रोड, कॉलेज रोड यासारखा उच्च वर्णीय भाग देखील आहे. येथे तरी गोडसेंना लीड मिळणं अपेक्षित होतं. या ठिकाणी आमदार देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गीते यांच्यात विधानसभेवरून स्पर्धा सुरू आहेत.

नाशिक पश्चिम
राजाभाऊ वाजे :93614
हेमंत गोडसे :1,24,827
गोडसेंचं लीड: 31,213
नाशिक पश्चिममध्ये महायुतीच्या भाजपच्या आमदार  सीमाताई हिरे यांचा सिडको, सातपूर हा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात हेमंत गोडसे यांना 31,213 मतांचं लीड घेता आलं आहे. 
हाच लीड मागील 2019 च्या लोकसभेत एक लाख चार हजारांचा होता. या ठिकाणी इच्छुक उमेदवार असलेले दिनकर पाटील यांनी माघारी घेतली. तरी हवी तशी कामगिरी केलेली नाही. तसेच जास्तीत जास्त भाजपाचे नगरसेवक देखील असताना केवळ 31 हजाराचाच लीड देता आला.

देवळाली
राजाभाऊ वाजे : 81,200
हेमंत गोडसे: 54,064
वाजेंचं लीड :  27,136
देवळाली मतदारसंघ हा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आमदार सरोज अहिरे यांचा बालेकिल्ला असताना देखील या ठिकाणी राजाभाऊ वाजे हे 27,136 मतांनी लीडने पुढे होते. त्यामुळे या भागात देखील राष्ट्रवादीचे आमदार सरोज आहेर यांनी हवे तसे काम केले नसल्याचे देखील दिसून आले. एकंदरीत जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी पाहिजे तसे काम केले नसल्याची देखील चर्चा आहे.  
याच ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले विजय करंजकर ऐनवेळी शिंदे गटात आले, आणि त्यांची भगूर नगरपालिकेत सत्ता असताना देखील त्यांची देखील अपेक्षित कामगिरी दिसून आलेली नाही.

इगतपुरी
राजाभाऊ वाजे :1,01,585
हेमंत गोडसे :58,052
वाजेंना लीड: 43,533
इगतपुरी मतदार संघ महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा असून यांनी महाविकास आघाडीला चांगलीच मदत केली असून त्या ठिकाणी गोडसेंना तब्बल 43,533 मतांचा लीड मिळालेला आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागामध्ये हेमंत गोडसे यांनी चांगले काम केले होते. मात्र हा ग्रामीण भाग सिन्नरला लागून असल्याने येथील मतदारांनी देखील वाद्यांची पसंती केल्याचे चित्र दिसून आले..
 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
मतदाना आधी निवडणूक आयोगाची चिंता, विधानसभेची तयारी कशी?
मोदींची सभा, रामाचा मुद्दा, सर्वाधिक आमदार-नगरसेवक; वाजेंनी कसा भेदला भाजपचा बालेकिल्ला?
What is importnace of Lok Sabha Speaker and finance minister TDP JDU Chandrababu Naidu Nitish Kumar PM Modi
Next Article
Explainer नितीश कुमार, नायडूंना भाजपाकडून लोकसभा अध्यक्षपद आणि अर्थमंत्रालय का हवंय?