जाहिरात
Story ProgressBack

बीडमध्ये महायुतीचे सर्वाधिक आमदार, तरीही पंकजा मुंडे पराभूत; कोणत्या विधानसभेमुळे झाला दगा?

राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रत्येक फेरीला अटीतटीची लढाई झालेली पाहायला मिळाली.

Read Time: 3 mins
बीडमध्ये महायुतीचे सर्वाधिक आमदार, तरीही पंकजा मुंडे पराभूत; कोणत्या विधानसभेमुळे झाला दगा?
बीड:

महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा 6553 मतांनी पराभव केला आहे. राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रत्येक फेरीला अटीतटीची लढाई झालेली पाहायला मिळाली. 32 फेऱ्यांमध्ये जणूकाही सापशिडीचा खेळच खेळत असल्याचा भास मतदान मोजणी दरम्यान जाणवत होता. पण या लढाईत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. बीड जिल्ह्यात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघात गेवराई, बीड, केज या ठिकाणी महाविकास आघडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळाले तर परळी,माजलगाव,आष्टी या गावात महायुतीच्या पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळाले.

बीड लोकसभेतील विधानसभेत कोणत्या पक्षाच्या आमदारांचं प्राबल्य 

  1. गेवराई - लक्ष्मण पवार (भाजप)
  2. माजलगाव - प्रकाश सोळंखे (अजित पवारांची राष्ट्रवादी)
  3. बीड - संदीप क्षीरसागर (शरद पवारांची राष्ट्रवादी)
  4. आष्टी - बाळासाहेब आजबे (अजित पवार राष्ट्रवादी)
  5. केज - नमिता मुंदडा (भाजप)
  6. परळी - धनंजय मुंडे (अजित पवारांची राष्ट्रवादी)

यावरुन लक्षात येईल की सहापैकी पाच विधानसभांवर महायुतीचे आमदार तर बीड या एकाच विधानसभेत शरद पवार गटाचा आमदार आहे. बजरंग सोनवणे यांना बीडमधून लीड मिळाली आहे तर परळीतून पंकजा मुंडे आघाडीवर होत्या. बीड आणि गेवराई या विधानसभा जागांवर पंकजा मुंडेंना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यातही गेवराई या विधानसभेत भाजपचे लक्ष्मण पवार आमदार आहेत. मात्र त्यांना फारशी मतं खेचून घेता आली नसल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना सर्वात कमी मतं पडली आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय निकाल...

▪️बजरंग मनोहर सोनवणे
विधानसभा मतदार संघात पडलेली मते
गेवराई       - 134505
माजलगाव - 104713
बीड          - 139917
आष्टी        - 113299
केज         -  123158
परळी       -  66940
पोस्टल     -  1418
एकूण मते -  683950

▪️पंकजा गोपीनाथराव मुंडे
विधानसभा मतदार संघात पडलेली मते
गेवराई      -  95409
माजलगाव - 105648
बीड          - 77605
आष्टी        - 145553
केज         -  109360
परळी       -  141774
पोस्टल     -   2048
एकूण मते -   677397

नक्की वाचा - राज्यातील 48 पैकी 26 नवनिर्वाचित खासदार मराठा; महायुतीपेक्षा मविआकडे ओबीसीचे खासदार जास्त

भाजपचं कुठे चुकलं?
मात्र या लढाईत पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे यांनी केलेला निसटता पराभव भाजपाच्या जिव्हारी लागणारा आहे. प्रचारादरम्यान मराठा आरक्षणाबद्दल केलेले वक्तव्य तसेच जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या मेळाव्यापासून दूर राहणेही पंकजा मुंडे यांना काही प्रमाणात महागात पडल्याचे दिसून येते. यामध्ये विशेषत: बीड जिल्ह्याचा काही भाग बीड व गेवराई मतदार संघ हा जालन्याच्या बाजूला लागून येतो. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मराठा आंदोलनाची तीव्रता विशेष करून या दोन्ही गावात दिसून आली. तसेच माजलगावमध्ये मुंडेंना अवघ्या एक हजाराची लीड मिळाली आहे.ज्या ठिकाणी महायुतीच्या बड्या नेत्यांच्या सभा झाल्या त्याच ठिकाणी जरांगे पाटील यांनी दिलेल्या भेटीमुळे महायुतीचा प्रभाव कमी झालेला दिसून आला. दरम्यान दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे भाजपला म्हणावे तसे यश दिसून आले नाही. उलट या सभेमुळे दलित-मुस्लिम मतदान भाजपला पडले नाही तर दुसरीकडे शरद पवारांनी घेतलेल्या दोन सभा व त्यांचे अंबाजोगाई बीड येथील दोन्ही मुक्काम बजरंग सोनवणे यांच्या विजयाच्या पथ्यावर पडले.


 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
राज्यातील 48 पैकी 26 नवनिर्वाचित खासदार मराठा; महायुतीपेक्षा मविआकडे ओबीसीचे खासदार जास्त
बीडमध्ये महायुतीचे सर्वाधिक आमदार, तरीही पंकजा मुंडे पराभूत; कोणत्या विधानसभेमुळे झाला दगा?
Nashik Lok Sabha election how Rajabhau Vaje won BJP stronghold
Next Article
मोदींची सभा, रामाचा मुद्दा, सर्वाधिक आमदार-नगरसेवक; वाजेंनी कसा भेदला भाजपचा बालेकिल्ला?
;