शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले?

शरद पवार यांनी एनडीटीव्ही मराठीला एक वेगळी आणि प्रदीर्घ मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपली मते स्पष्टपणे मांडली. यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा असावा यासंदर्भातही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सागर कुलकर्णी, राहुल कुलकर्णी

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या आशा-आकांक्षा पल्लवित झाल्या होत्या. महायुतीच्या हातून सत्ता खेचून घेत सत्तेत विराजमान होऊ शकतो हा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटू लागला. जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा, बंडखोरी हे सगळं मागे सारत मविआचे नेते एकदिलाने काम करताना दिसत आहेत.  तीनही पक्षांमध्ये धूसफूस आहे, मात्र त्याचा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होऊ नये यासाठी तीनही पक्षांचे प्रमुख नेते प्रयत्न करत आहेत.  महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबाबत या आघाडीतील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.  उद्धव ठाकरे यांनी जागावाटप आणि प्रचाराला सुरुवात होण्याआधी, 'मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा' अशी मागणी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पहिले महायुतीला सत्तेतून बाहेर खेचणे हे आमचे कर्तव्य असल्याचे म्हणत या मुद्दाला बगल दिली होती. मात्र शरद पवारांनी आता पहिल्यांदाच याबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

नक्की वाचा :17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कात कोणत्या ठाकरेंचा आवाज घुमणार?

शरद पवारांची भूमिका नेमकी काय आहे ?

शरद पवार यांनी एनडीटीव्ही मराठीला एक वेगळी आणि प्रदीर्घ मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपली मते स्पष्टपणे मांडली. यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा असावा यासंदर्भातही त्यांनी आपले मत व्यक्त केले. लाडकी बहीण योजनंसंदर्भातही त्यांनी आपले मत व्यक्त केले. महायुतीने ही योजना आणली असून महाविकास आघाडी सत्तेत आल्यास ही योजना बंद करेल असा प्रचार केला जात आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, लाडकी बहीण योजना ही आम्ही सत्तेत आल्यास रद्द करणार नाही मात्र त्यात काही बदल करू.  याच मुलाखतीमध्ये शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले. त्यांनी म्हटले की, "मुख्यमंत्री पदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिगत स्वच्छ कारभार केला अशी जनभावना होती ती चुकीची नाही."

Advertisement

नक्की वाचा - '...म्हणून धारावी विकासाला उद्धव ठाकरेंचा विरोध', राज ठाकरेंनी सांगितलं आर्थिक राजकारण

सुप्रिया सुळे यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार का ? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मुख्यमंत्री पदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी म्हटले की, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच आहे मात्र सुप्रिया यांना देशाच्या राजकारणात अधिक रस आहे.

Advertisement

पवारांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, "स्वच्छ शब्दांमध्ये सांगतो ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल इतरांनी त्याला पाठिंबा द्यावा."

Advertisement
Topics mentioned in this article