'माझं पांडुरंगा बरोबर डायरेक्ट कनेक्शन' सुप्रिया सुळेंचं लॉजिक काय?

सुप्रिया सुळे खानापूर विधानसभा मतदार संघात प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करत महायुतीला लक्ष्य केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे या जोरदार प्रचार करत आहेत. त्या प्रत्येक सभेत अजित पवारां बरोबरच महायुतीला टार्गेट करताना दिसत आहे. त्या खानापूर विधानसभा मतदार संघात प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करत महायुतीला लक्ष्य केलं. यावेळी बोलताना त्या म्हणाला माझं पांडूरंगा बरोबर डायरेक्ट कनेक्शन आहे. राम कृष्ण हरी वाजवा तूतारी. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनीही प्रतिसाद दिला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

खानापूरमध्ये सुप्रिया सुळे या प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सुरूवातीला पांडूरंगाची आठवण काढली. मला पांडुरंगावर विश्वास आहे. त्याच्या बरोबर माझं डायरेक्ट कनेक्शन आहे. त्यामुळे काय बोलायचं ते मी पांडुरंगाला विचारते असं सुप्रिया सुळे या वेळी म्हणाल्या. माझं जे आहे ते मनापासून आहे. बोलायला मेंदू लागतो. पण त्यासाठी मन असणंही गरजेचं आहे. दुसऱ्यांनी लिहून दिलेलं भाषण मी वाचत नाही. त्यामुळे पांडुरंगाला स्मरून रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी घोषणाच सुप्रिया सुळे यांनी दिली. 

ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO

लोकसभेला लाडकी बहीण नव्हती. लोकसभेत दणका मिळाल्यानंतर यांना बहीण लाडकी झाली असा टोला ही सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला. या सरकारला नात्याची किंमत कळली नाही. त्यांनी पंधराशे रूपये ही नात्याची किंमत केली. माझ्यावरही टीका केली जाते. माझ्या मागे ही ईडी सीबीआय इन्कमटॅक्सचा ससेमीरा लावलेला आहे. असं गलिच्छा राजकारण या आधी कधी झालं नव्हतं. 

ट्रेंडिंग बातमी - भन्नाट हिंदी , सॉलिड कविता! प्रियांका गांधींची सभा घोगरे काकींनी गाजवली

पक्ष चोरला जात आहे. चिन्ह चोरलं जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष उभा केला वाढवला. तोच पक्ष काढून घेण्यात आला. त्या मागे षडयंत्र रचलं गेलं होतं. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंचे आहे. पण दिल्ली महाराष्ट्राकडे वाईट नजरेने पाहात आहे. अशांना या निवडणुकीत धडा शिकवला पाहीजे असं ही ते म्हणाले. पन्नास खोके ऐकदम ओके हे बदलणे गरजेचे आहे ही बाब चुकीची आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'नरेंद्र मोदींची मेमरी लॉस' राहुल गांधींचा हल्लाबोल

या राज्यात आर. आर. पाटील यांनी केलेलं काम सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. माझी लढाई ही वैचारीक आहे. ही वैयक्तीक लढाई नक्कीच नाही. महागाई आणि बेरोजगारीने सर्व जण हैराण झाले आहेत. आम्ही  लाडकी बहीण आहोच, पण ती महालक्ष्मी आहे हे विसरू नका असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. विरोधक येतील. तुम्हाला काही तरी देतील तर ते दोन्ही हाताने घ्या. जे देत आहेत ते तुमचेच आहे असंही ते यावेळी म्हणाल्या. सर्वात मोठी ताकद कोणती आहे तर इमानदारी आहे असं ही त्यांनी सांगितलं.