'अब की बार 400 पार', होणार का? NDTV च्या पोल ऑफ पोल्सची आकडेवारी काय सांगते?

एनडीटीव्हीच्या पोल्स ऑफ पोलच्या आकडेवारीनुसार, यावेळी एनडीए किमान 372 जागांवर आपला विजय निश्चित करेल असा अंदाज आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत 'अब की बार 400 पार' असा मानस भाजपने केला आहे. मात्र सध्याच्या वातावरणात भाजपचं 'मिशन 400' कितपत पूर्ण होतंय याचा अंदाज अनेक सर्वेमधून समोर आला आहे.   NDTV च्या पोल ऑफ पोल्समधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार एनडीए 'मिशन 400' च्या जवळ जाताना दिसत आहे. 

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपने एकट्या 303 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएने देशभरात 543 पैकी 353 जागांवर विजय मिळवला होता. एनडीटीव्हीच्या पोल्स ऑफ पोलच्या आकडेवारीनुसार, यावेळी एनडीए किमान 372 जागांवर आपला विजय निश्चित करेल, असा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला केवळ 122 जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचा देखील अंदाज आहे. 

अमेठीच्या प्रश्नावर राहुल गांधींनी सोडलं मौन, निवडणूक लढवण्यावर दिलं उत्तर

महाराष्ट्रात एनडीएला 2019 च्या तुलनेत फटका बसण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीलाला राज्यात 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 17 जागा तर इतर साठी एक जागा मिळण्याची शक्यता एनडीटीव्हीच्या पोल ऑफ पोल्समध्ये वर्तवली आहे. मागच्या निवडणुकीत राज्यात एनडीएने मोठी मुसंडी मारली होती. त्यावेळी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा मिळवत विरोधकांना दणका दिला होती. तर विरोधकांच्या वाट्याला अवघ्या सात जागा आल्या होत्या. 

उत्तर प्रदेशात एनडीएची हवा?

उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला मोठं यश मिळणार असल्याचा अंदाज आहे. लोकसभा जागांच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात 80 पैकी 74 जागा एनडीएला मिळण्याची शक्यत आहे. तर इंडियाच्या आघाडीच्या वाट्याला अवघ्या 5 जागा मिळतील, असा अंदाज एनडीटीव्हीच्या पोल ऑफ पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. 

Advertisement

ठाण्याचा 'नायक' ठरला? शिंदेंचा जवळच्या नेत्या सिग्नल मिळाला?

काय आहे NDTV पोल ऑफ पोल्स? 

देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. याचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. त्याआधी अनेक न्यूज चॅनेल्सने सर्वे एजन्सीजसोबत सर्वे आणि ओपिनिअन पोल जारी केले. ज्याची सरासरी काढून एनडीटीव्हीने पोल ऑफ पोल्स तयार केला आहे. 

Topics mentioned in this article