जाहिरात

PM Modi Meta post: मेटाने PM मोदींची 'ती' पोस्ट हटवल्याने वाद! काय सांगितले कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट (NEET) पेपर लीक प्रकरणासंदर्भात फेसबुकवर पोस्ट केलेला व्हिडिओ डिलीट झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

PM Modi Meta post: मेटाने PM मोदींची 'ती' पोस्ट हटवल्याने वाद! काय सांगितले कारण?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'मेटा' (Meta) आणि केंद्र सरकार आमनेसामने आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात गाजलेल्या 'नीट' पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, मेटाने ही पोस्ट प्लॅटफॉर्मवरून हटवल्याने मोठा वाद निर्माण झाला. या प्रकारानंतर केंद्र सरकारने तीव्र आक्षेप घेत उत्तर मागितल्यानंतर मेटाने आपली चूक मान्य करत सरकारची माफी मागितली आहे.

मेटाने काय स्पष्टीकरण दिले?

भारत सरकारने या गंभीर प्रकरणाची दखल घेत मेटाकडे विस्तृत अहवाल मागितला होता. मेटाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, ही पोस्ट एका तांत्रिक बिघाडामुळे सिस्टीमकडून चुकून हटवली गेली होती. कंपनीने आपल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत पंतप्रधान मोदींची ती फेसबुक पोस्ट पुन्हा रिस्टोअर केली आहे.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

मात्र, मेटाच्या या स्पष्टीकरणावर केंद्र सरकारने अद्याप समाधान व्यक्त केलेले नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून मेटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप चालवणारी मार्क झुकरबर्ग यांची 'मेटा' ही अमेरिकन कंपनी भारतामध्ये सर्वात मोठा युजरबेस सांभाळते.

पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया लोकप्रियता

  • फेसबुक: 6.1 कोटी फॉलोअर्स
  • इंस्टाग्राम: 10.5 कोटी फॉलोअर्स
  • व्हॉट्सॲप चॅनेल: 1.5 कोटी फॉलोअर्स

(नक्की वाचा-  Rain News: महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट)

यापूर्वीही भडकाऊ पोस्ट न हटवणे, माहिती तंत्रज्ञान (IT Rules) नियमांचे उल्लंघन करणे यावरून मेटा आणि भारत सरकारमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. आता या ताज्या चौकशीत काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com