भाजपकडून महाराष्ट्राकडे जास्त लक्ष दिलं जात असून अमित शाहांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक सभा महाराष्ट्रात आयोजित केल्या जात आहेत. दरम्यान राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका लावण्यात आला आहे.
विदर्भानंतर आता मराठवाडा आणि खानदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होत आहेत. आज 29 एप्रिल आणि उद्या 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रभरात पंतप्रधान मोदींच्या सहा सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सोमवारी सोलापूर, कराड आणि पुणे येथे तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे मोदींच्या प्रचारसभा होणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 29 एप्रिल रोजी सोलापुरात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ दुपारी दीड वाजता होम मैदानावर सभा होणार आहे.मोदींच्या सभेकडे संपूर्ण सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांना काऊंटर अटॅक करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी एकत्रित सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कर्णिक नगर येथील मैदानावर चार वाजता होणार आहे. होम मैदानावर दिव्य मंडप उभारण्यात आला असून नागरिकांसाठी 80 हजार खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे.
नक्की वाचा - सांगलीनंतर 'या' मतदारसंघातही मविआमध्ये बंडखोरी; आता ठाकरे काय करणार?
याशिवाय उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ दुपारी 3.45 वाजता कराड येथे सभा होणार आहे. यानंतर पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हडपसर येथे सायंकाळी 5.45 वाजता सभा होणार आहे. पुण्यातील मोदींच्या सभेसाठी येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
पुण्यातील कोणते रद्द राहणार बंद?
- टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद
- सोलापूर रोडवरील अर्जुन रोड जं ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार रस्ता बंद
- बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुसऱ्या दिवशी 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा माढातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे सभा घेणार आहे. येथील सभा संपल्यानंतर धाराशिव येथील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी आणि तीन वाजता लातूर भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांच्यासाठी सभा घेण्यात येणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून पाहता व ऐकता यावे म्हणून या सभेत युवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाणार आहे. 30 एकरमध्ये सभेची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास अडीच लाख स्क्वेअर फूटमध्ये डोम उभारण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने सभेसाठी आलेल्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यासभेसाठी राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील बडे नेते लातूरला येण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये सुधारकर श्रृंगारेंच्या प्रचाराच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविजय संकल्प सभेचं आयोजन केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world