पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नांदेड आणि परभणी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सभा घेतली. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पराभव समोर दिसतोय म्हणून खचून न जात प्रयत्न करत राहिलं पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदींनी काँग्रेससह विरोधकांना लगावला.
लोकशाहीसाठी मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना केलं आहे. भारतात मतदानाची टक्केवारी वाढली की त्याचा जगात प्रभाव पडतो. 10 वर्षात जनतेला मिळालेला लाभ हा फक्त ट्रेलर आहे. अजून खूप काही करायचं आहे, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी जनतेला दिलं.
राजकीय पक्षांना मी सांगेल, की तुम्हाला वाटत असेल की निवडणूक हरणारच आहोत तर कशाला मेहतन करायची. मात्र लोकशाहीसाठी मेहनत करा. कारण आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा आणि परवा नाहीतर तेरवा कधीतरी तुम्हाला जिंकण्याची संधी मिळेल. असं निराश होऊन चालणार नाही, अशा शब्दात मोदींनी विरोधकांना डिवचलं.
महायुतीमधील धुसफूस वाढली, राष्ट्रवादीचाच एक गट अजित पवारांवर नाराज!
ज्यांचा पराभव निश्चित आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील मी आत्मविश्वास वाढवत आहे. त्यांनी देखील मतदारांना मतदानासाठी आग्रह करावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
निवडणुकीत विरोधकांना धडा शिकवणे आवश्यक आहे. राहुल गांधी यांनी अमेठी सोडून वायनाड मतदारसंघ निवडला आहे. मात्र वायनाडमधील निकाल लागल्यावर राहुल गांधींना सुरक्षित मतदारसंघ पुन्हा शोधावा लागणार आहे, असं अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
काँग्रेस नेहमी वंचितांच्या विरोधात
काँग्रेस नेहमी वंचितांच्या शोषितांच्या गरिबांच्या विरोधात राहिली आहे. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर इलाज करणे ही मोदींची गॅरंटी आहे. इंडिया आघाडीचे नेते सनातन धर्माचा अपमान करतात. त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही विश्वास टाकणार का? त्यामुळे या निवडणुकीत त्यांना धडा शिकवणे गरजेचं आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
गावितांना धक्का! बडा नेता काँग्रेसकडे गेला, नंदूरबारचं गणित बिघडणार?
पहिल्या टप्प्यात एनडीएला एकतर्फी मतदान
पहिल्या टप्प्यात लोकांनी NDA ला एकतर्फी मतदान केले आहे. लोक मतदान करायला जातात तेव्हा विचार करतात की देश कुणाच्या हातात सोपवायचा. इंडिया आघाडीच्या मतदान करण्यासाठी त्यांच्याकडे चेहराच नाही. काँग्रेसचे नेत्यांनी आपला पराभव मान्य केला आहे. इंडिया आघाडीकडे निवडणूक लढण्यासाठी उमेदवार देखील मिळत नाहीये. अनेक ठिकाणी त्यांचे नेते प्रचार देखील करत नाहीयेत, अशी स्थिती काँग्रेसची असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं.